Maharashtra HSC Result 2022 : मोठी बातमी ! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, विद्यार्थ्यांना उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 16:49 IST2022-06-07T14:07:59+5:302022-06-07T16:49:48+5:30
Maharashtra Board HSC Result Date 2022 Confirmed The 12th result will be out tomorrow : विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन हा निकाल पाहता येईल.

Maharashtra HSC Result 2022 : मोठी बातमी ! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, विद्यार्थ्यांना उत्सुकता
पुणे - बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात असतानाच आता बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. आता, उद्या म्हणजे बुधवार ८ जून रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार Maharashtra Board HSC Result Date 2022 Confirmed आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना आता चांगलीच उत्सुकता लागली आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन हा निकाल पाहता येईल.
कोरोना महामारीमुळे यंदा विद्यार्थ्यांनी घरातून शिक्षण घेतले. ऑनलाईन क्लासच्या उपस्थितीत गतवर्षी अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला होता. मात्र, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. त्यामुळे, यंदाच्या निकालाची विद्यार्थ्यांना अधिकची उत्सुकता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्हिडिओ ट्विट करुन बारावीच्या निकालासंदर्भात माहिती दिली आहे. ''महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल,'' असं ट्विट त्यांनी केलंय.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.#HSC#results@CMOMaharashtra@MahaDGIPRpic.twitter.com/sZm0rCi3fo
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 7, 2022
असा चेक करा निकाल
विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in भेट द्यावी
त्यानंतर होम पेजवर दिलेल्या “इयत्ता 12वी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा
तुमचा 12वी निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
तुमच्या निकालाची प्रत प्रिंट काढून तुमच्याकडेच ठेवा
या वेबसाईटवर पाहा निकाल