पुणे महापालिकेकडून निविदा कोट्यवधींच्या काम मात्र 'उणेपुरे'च : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराची 'वर्षपूर्ती'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 11:10 AM2020-09-25T11:10:33+5:302020-09-25T11:11:38+5:30

पुणे महापालिकेचा पैसा 'गाळात' : सीमाभिंती, कलव्हर्टची कामे अद्यापही अपुर्णच

However, the work of crores of tenders is not enough | पुणे महापालिकेकडून निविदा कोट्यवधींच्या काम मात्र 'उणेपुरे'च : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराची 'वर्षपूर्ती'

पुणे महापालिकेकडून निविदा कोट्यवधींच्या काम मात्र 'उणेपुरे'च : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराची 'वर्षपूर्ती'

googlenewsNext
ठळक मुद्देसत्ताधारी आणि विरोधक केवळ गैरव्यवहाराच्या आरोप-प्रत्यारोपात मश्गूल

पुणे : अतिवृष्टीमुळे शहरात आलेल्या पुराला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात पालिकेने तातडीच्या कामांसाठी ७७ कोटींची आणि नाल्यामधील गाळ उचलण्यासाठी ८५ कोटींच्या निविदा काढल्या. कोट्यवधींच्या निविदा काढून ठेकेदारांवर खैरात केलेल्या पालिकेकडून पुरानंतर झालेले काम मात्र उणेपुरेच आहे. अद्यापही नाल्याच्या पडलेल्या भिंती तशाच आहेत. नाल्यामधील राडारोडा अनेक ठिकाणी तसाच आहे. यासोबतच नाल्यांवर छोटे पूल (कलव्हर्ट) बांधण्याची कामेही अपुर्णच आहेत. 
 

पूर आल्यानंतर अनेकांची घरे त्यामध्ये वाहून गेली. नाल्यालगत असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. यासोबतच सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. नाल्याबाहेर असलेल्या रस्त्यांवरून तसेच सोसायटयांमध्ये जवळपास १२ ते १५ फुटांपर्यंत पाणी होते. अनेकांच्या घरात, प्रार्थनास्थळांमध्ये, दुकानांमध्ये गुडघ्याएवढा गाळ आणि कचरा जमा झाला होता. अग्निशामक दल, एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करीत शेकडो नागरिकांचे प्राण वाचविले होते. रस्त्यावर वाहून आलेला गाळ आणि कचरा हटविण्याचे काम अहोरात्र सुरु होते. पालिकेने त्यानंतर तातडीने कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यामधील एकही काम पुर्ण झालेले नाही. काही कामे तर सुरुच झालेली नाहीत.
         सत्ताधारी आणि विरोधक केवळ गैरव्यवहाराच्या आरोप-प्रत्यारोपात मश्गूल आहेत. अंबिल ओढल्याला आलेल्या पुरामध्ये महापालिकेचे २८० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आकडा सांगितला जातो. यामध्ये सोसायट्यांच्या सीमाभिंती आणि अंबिल ओढ्याच्या सीमाभिंत, नाले, पावसाळी वाहिन्यांचा समावेश आहे. पालिकेने प्रायमुव्ह या संस्थेकडून नाल्याचे सर्वेक्षण करुन घेत पुराच्या कारणांचा शोध घेतला होता. परंतू, या संस्थेने सुचविलेल्या एकाही उपाययोजनेवर अद्याप काम झालेले नाही. 
          पालिका प्रशासनाने ३ किलोमीटर सीमाभिंतीसाठी ५३ कोटी आणि कलव्हर्टच्या कामासाठी २४ कोटी प्रस्तावित केले होते. कलव्हर्टच्या कामासाठी ३८ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. गैरव्यवहाराचे आरोप झाल्यामुळे ही निविदा रद्द करण्यात आली. सीमाभिंती बांधण्यासाठी काढलेल्या २० कोटींच्या निविदेमध्ये गैरव्यवहाराचा आरोप झाल्यावर याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. 
======
आंबील ओढा कलव्हर्टच्या निविदेत ठेकेदारांची 'रिंग'
आंबील ओढ्यावरील बाधित झालेल्या २१ ठिकाणच्या कलव्हर्टच्या बांधकामाकरिता काढण्यात आलेल्या ३८ कोटी रुपयांच्या निविदेमध्ये ठेकेदारांची 'रिंग' झाल्याचे उघडकीस आले होते. अपात्र ठेकेदारांना पात्र ठरविण्याचा प्रताप सल्लागार कंपनीने केला होता. याप्रकरणी सल्लागाराला पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावरही पुढे काही होऊ शकलेले नाही. 
======
शहरातील सर्वाधिक १४ किलोमीटर लांबीच्या आंबिल ओढ्यामधून पालिकेने ठेकेदारामार्फ ३६ हजार ९८४ घनमीटर एवढा गाळ काढल्याचा दावा केला आहे. आंबिल ओढ्यासह शहरातील १८ बेसिनमधील पावसाळी पाण्याच्या व्यवस्थापनासाठी नाला सुधारणेची कामे करणे, कलव्हर्ट बांधणे, पावसाळी वाहिन्या टाकण्यासह अनुषंगिक कामे करण्यासाठी तब्बल ८५ कोटी ५१ लाख ५८ हजारांची निविदा काढण्यात आली होती. या निविदेमधील जी कामे झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
=====

प्रस्तावित कामे
सीमाभिंत बांधणे : ३ किलोमिटर
कलव्हर्ट बांधणे : २१ ठिकाणी

Web Title: However, the work of crores of tenders is not enough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.