किती साली मुख्यमंत्री व्हायचंय,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:11 IST2021-01-22T04:11:09+5:302021-01-22T04:11:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “मी जयंत पाटील यांच्याशी चर्चा करेन. त्यांना कोणत्या वर्षी मुख्यमंत्री व्हायचे आहे, हेही विचारेन”, ...

How many years do you want to be the Chief Minister, | किती साली मुख्यमंत्री व्हायचंय,

किती साली मुख्यमंत्री व्हायचंय,

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “मी जयंत पाटील यांच्याशी चर्चा करेन. त्यांना कोणत्या वर्षी मुख्यमंत्री व्हायचे आहे, हेही विचारेन”, असा टोला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लगावला.

पुण्यातील ‘प्रबोधन’ महोत्सवाच्या उद्घाटनानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. इस्लामपूर येथील एका मुलाखतीत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. या संदर्भात विचारले असता डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

“मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी जास्त संख्याबळाची गरज असते. राजकीय जीवनात सर्वोच्च पद मिळवणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते,” अशा आशयाचे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी केले होते. यावर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “मोठी इच्छा बाळगणे हे प्रत्येक राजकीय पक्षाचे काम असते. त्यावर भाष्य करता येणार नाही.”

Web Title: How many years do you want to be the Chief Minister,