शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

समाजामध्ये किती खालच्या पातळीची विकृती असू शकते; रुपाली चाकणकरांची दमानिया यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:45 IST

अजितदादांच्या कुटुंबावर सातत्याने टीका करणे ही अतिशय घाणेरडी मानसिकता असून दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार

पुणे: पार्थ पवार यांना पुण्यातील जमीन घोटाळ्यात क्लिनचीट मिळाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या आहेत. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या दाव्यांचे जोरदार खंडन केले आहे. पार्थ पवारांना कोणतीही क्लिन चीट मिळालेली नाही, उलट त्यांची चौकशी अजूनही सुरूच असल्याचे सांगितले आहे.  या संदर्भातील शेवटची बैठक अद्याप होणे बाकी आहे. दमानिया यांनी पुराव्यादाखल काही कागदपत्रांच्या प्रिंट आऊट सादर केल्या आहेत. 

शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात झालेल्या करारावर पार्थ पवार यांचे नाव, सही आणि शिक्का असल्याचा दावा त्यांनी केला आहे. खारगे समिती पार्थ पवारला या प्रकरणातून बाहेर काढू शकत नाही. जर तसा प्रयत्न झाला, तर मी समितीला धारेवर धरीन," असा इशाराही दमानिया यांनी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत पार्थ पवार या घोटाळ्यातून बाहेर येऊ शकत नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला असून, प्रसंगी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दमानिया यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

चाकणकर म्हणाल्या, अंजली दमानिया यांना अनेक कपोलो कल्पित कथा सांगायची सवय आहे. अंजली दमानिया यांची आजची पत्रकार परिषद ऐकून समाजामध्ये किती खालच्या पातळीची विकृती असू शकते अशी टीका त्यांनी केली. एखाद्या व्यक्तीला आणि एका कुटुंबाला अंजली दमानिया सातत्याने बदनाम करत असतात. यापूर्वी देखील अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर अनेक आरोप केले, पण त्यातला कुठलाही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नाहीत. आता त्या पार्थ पवार यांच्यावरती आरोप करत आहेत. ही अतिशय घाणेरडी मानसिकता आहे असे चाकणकर म्हणाल्या. 

अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार 

खरंतर या कुटुंबियांनी आपला घरातला माणूस गमावला आहे. अंजली दमानिया पुराव्या अभावी सातत्याने वक्तव्य करुन चर्चेत  येत आहेत. ही अतिशय घाणेरडी मानसिकता आहे. अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा चाकणकर यांनी दिला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rupali Chakankar Criticizes Damania; Highlights Societal Degradation in Pawar Case.

Web Summary : Rupali Chakankar slams Anjali Damania for falsely accusing Parth Pawar in a land scam. Chakankar alleges Damania spreads baseless rumors, defaming the Pawar family, and threatens legal action against her.
टॅग्स :Puneपुणेanjali damaniaअंजली दमानियाRupali Chakankarरुपाली चाकणकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसparth pawarपार्थ पवारAjit Pawarअजित पवारMundhvaमुंढवा