कृष्णकांत कुदळे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 21:06 IST2019-02-10T11:08:42+5:302019-02-10T21:06:20+5:30

कृष्णकांत कुदळे ( वय 74) यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले.

Hotel businessman Krishnakant Kudale passed away | कृष्णकांत कुदळे यांचे निधन

कृष्णकांत कुदळे यांचे निधन

पुणे : कृष्णकांत कुदळे ( वय 74) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. पुणे फेस्टिवलचे तसेच महात्मा फुले समता परिषदेचे ते कार्याध्यक्ष हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. 

कृष्णकांत कुदळे यांनी अनेक संस्थांमध्ये विविध पदं भूषवली आहेत. अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष हाेते. त्याचबराेबर महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे अध्यक्ष, सासवड माळी शुगर फॅक्टरीचे माजी चेअरमन अशा विविध संस्थांमध्ये ते कार्यरत हाेते. आज दुपारी 3 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमित त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Web Title: Hotel businessman Krishnakant Kudale passed away