शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

मासेमारी करताना भयंकर घटना; वीज कोसळून २७ वर्षीय युवकाचा जागीच मुत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 17:23 IST

दुपारी युवक ओढयात मासेमारी करण्यासाठी गेला असता भामा आसखेड धरण परिसरात वादळी वाऱ्यासह वीजेचा गडगडाट सुरू झाला होता

राजगुरूनगर: रौंधळवाडी ( ता खेड ) या परिसरात भामा आसखेडधरणाच्या लगत मासेमारी करणाऱ्या युवकाच्या अंगावर वीज कोसळून जागीच मुत्यू झाला. संतोष गुलाब खंडवे (वय २७ वेताळे ता खेड ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

दि २६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. संतोष खंडवे हा मित्रासोबत रौंधळवाडी परिसरातील भामा आसखेड धरणाच्या लगत असणाऱ्या विरोबा वस्तीच्या ओढयात मासेमारी करण्यासाठी गेला होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या भागात वादळी वाऱ्यासह वीजेचा गडगडाट सुरू झाला होता. यावेळी वीज अचानक वीज अंगावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोबाईलसह युवकाच्या अंगावरची कपडे जळून खाक झाले. शरीराची एक बाजू पुर्णपणे जळून गेली. मित्रांनी तात्काळ पाईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले. डॉक्टरांनी मृत्य घोषित केले.

 घटनास्थळी पंचनामा मंडल अधिकारी एम ,एस सुतार, ग्राम महसूल अधिकारी एम.जी क्षीरसागर या घटनेचा पंचनामा केला यावेळी ग्रामपंचायत अधिकारी  ए. एन फुलपगर,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष जयसिंग दरेकर, माजी उपसरपंच दीपक डांगले, अनिल रौंधळ, विपुल खेंगले, कबीर रौंधळ, हरिभाऊ रौंधळ, नवनाथ डांगले आदी उपस्थित होते. पाईट परिसरात कमीत कमी पाच किलोमीटर अंतरापर्यंत रेंज असणाऱ्या वीज प्रतिबंधक टॉवर बसवण्याची मागणी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडRainपाऊसweatherहवामान अंदाजthunderstormवादळDamधरणDeathमृत्यू