'हॉर्न क्यो बजाता है, तेरेको बहोत मस्ती चढी है क्या', कारचालकावर चाकूने सपासप वार

By विवेक भुसे | Updated: July 16, 2023 15:24 IST2023-07-16T15:24:25+5:302023-07-16T15:24:37+5:30

रात्री उशिरा चौकात फटाके वाजवत असताना एका कारचालकाने हॉर्न वाजविल्याने तरुणाने कारचालकावर चाकूने वार केले

Horn kyo bajata hai; The driver was stabbed with a knife | 'हॉर्न क्यो बजाता है, तेरेको बहोत मस्ती चढी है क्या', कारचालकावर चाकूने सपासप वार

'हॉर्न क्यो बजाता है, तेरेको बहोत मस्ती चढी है क्या', कारचालकावर चाकूने सपासप वार

पुणे : अनेकदा रात्री उशिरा फटाके वाजण्याची टुम सध्या शहरात सुरु झाली आहे. अशी रात्री उशिरा चौकात फटाके वाजवित असताना एका कारचालकाने हॉर्न वाजविल्याने तरुणाने कारचालकावर चाकूने वार करुन त्याच्या खूनाचा प्रयत्न केला.

याबाबत सलीम हुसेन शेख (वय ५२, रा. डेक्कन टॉवर, कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयान मैनुद्दीन कुरेशी (वय २०, रा. भीमपूरा, कॅम्प) याला अटक केली आहे. हा प्रकार कॅम्पमधील कुरेशी मस्जिद चौकात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कारने घरी जात होते. यावेळी आयान कुरेशी हा कुरेशी मस्जिद चौकात फटाके वाजवत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी हॉर्न वाजविला. त्याचा राग येऊन आयान याने फिर्यादी यांना तू हॉर्न क्यो बजाता है, तेरेको बहोत मस्ती चढी है क्या असे म्हणून चाकूने त्यांच्यावर सपासप वार करुन गंभीर जखमी केले. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन आयान कुरेशी याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Web Title: Horn kyo bajata hai; The driver was stabbed with a knife