शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांचा सन्मान करा !

By admin | Updated: May 26, 2015 01:21 IST

राष्ट्रवादीने आपल्याला महापालिकेतील पदे विकासकामे करण्यासाठी दिली आहेत, आपआपसात भांडत बसण्यासाठी नाही. एकमेकांचा सन्मान करायचा असतो,

पुणे : राष्ट्रवादीने आपल्याला महापालिकेतील पदे विकासकामे करण्यासाठी दिली आहेत, आपआपसात भांडत बसण्यासाठी नाही. एकमेकांचा सन्मान करायचा असतो, हे तुम्हाला कोणत्या भाषेत सांगितले पाहिजे, असे खडे बोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुरबुरीचे राजकारण सुरू आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील खराडी व वडगावशेरी पाणी प्रश्नावरून स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम व सर्वपक्षीय गटनेत्यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर गटनेत्यांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या कारभाराविषयी माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांनी सर्वसाधारण सभेत जाहीर टीका केली होती. त्यावर गेली चार वर्षे जगताप यांनी डोळ्याला पट्टी लावली होती का? असे प्रत्युत्तर महापौर धनकवडे यांनी दिले होते. राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर आल्याने अजित पवार व्यथीत झाले होते. त्यामुळे बारामती हॉस्टेल येथे महापौर दत्तात्रय धनकवडे, शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम व सभागृहनेते बंडू केमसे यांच्याशी पवार यांनी रविवारी चर्चा केली. त्या वेळी महापालिकेतील कारभारावरून सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले. महापालिकेतील माजी पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. (प्रतिनिधी)