शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्म्यांबद्दल आस्था आणि आदर हवा

By admin | Updated: March 24, 2017 03:46 IST

‘‘आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्यामागे देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्मा राजगुरुंसारख्या अनेक हुतात्म्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

दावडी : ‘‘आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्यामागे देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्मा राजगुरुंसारख्या अनेक हुतात्म्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांची आठवण जयंती-पुण्यतिथीच्या वेळी न काढता हुतात्म्यांबद्दल आस्था व आदर बाळगून त्यांच्या कार्याची प्रेरणा आपण सतत जिवंत ठेवायला हवी,’’ असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले. हुतात्मा राजगुरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार सुनील जोशी, सुभद्रा शिंदे, अ‍ॅड. देवेंद्र बुट्टे-पाटील, राम पठारे, इंदिरा अस्वार, उषा कानडे, नगराध्यक्षा सारिका घुमटकर, बापूसाहेब थिगळे, कोंडीभाऊ टाकळकर, किरण आहेर, मुकुंद आवटे, विजया शिंदे, अमृता गुरुव, सोनाली सांडभोर, स्नेहल राक्षे, संपदा सांडभोर, प्रकाश वाडेकर उपस्थित होते. हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व महात्मा गांधी विद्यालयाच्या एनसीसीच्या कॅडेट्सनी मानवंदना दिली. हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाजवळील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन शहीद राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांना मान्यवरांनी मानवंदना दिली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात अभिनेते विक्रम गोखले यांनी राजगुरू प्रतिष्ठानला सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी दर वर्षी सुमारे २१ हजारांची देणगी देण्याचे जाहीर केले. या वर्षीचा धनादेश प्रतिष्ठानकडे सुपूर्द केला. तसेच शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांनी दर वर्षी ५ हजारांची देणगी प्रतिष्ठानच्या सामाजिक कामांसाठी देण्याचे जाहीर केले. दरम्यान, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जन्मभूमी असेलल्या वाड्यावरती सकाळी १० वाजता ध्वजारोहण गाडे यांच्या हस्ते केले.सुनील गाडे म्हणाले, ‘‘शासनाकडे मागील वर्षी ७८ कोटी रुपयांचा आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळणार आहे. तसा पाठपुरावा सुरू आहे. शासनस्तरावर मान्यता मिळल्यानंतर तातडीने येथील जागा संपादन करून सुसज्ज ग्रंथालय, रस्ते तसेच हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे भव्यदिव्य स्मारक बांधले जाईल.’’ या वेळी स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, सुशील मांजरे, बाबाजी काळे, किरण मांजरे, राहुल गोरे, पंचशील फलके, सचिन भंडारी, शैलेश रावळ, संदीप वाळुंज, योगेश गायकवाड उपस्थित होते. (वार्ताहर)