घर बसल्या विद्यार्थ्यांना शाळेत घेता येणार प्रवेश; जिल्हा परिषदेतर्फे ऑनलाईन व्यवस्था 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 05:35 PM2020-04-15T17:35:37+5:302020-04-15T17:44:42+5:30

कोरोनामुळे शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश कसा द्यायचा असा प्रश्न पालकांना पडला होता..

Home-based students can be admitted to school; Online arrangement by the Zilla Parishad | घर बसल्या विद्यार्थ्यांना शाळेत घेता येणार प्रवेश; जिल्हा परिषदेतर्फे ऑनलाईन व्यवस्था 

घर बसल्या विद्यार्थ्यांना शाळेत घेता येणार प्रवेश; जिल्हा परिषदेतर्फे ऑनलाईन व्यवस्था 

googlenewsNext
ठळक मुद्दे पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीरजिल्हा परिषदेने यावर तोडगा काढला असून ऑनलाईन पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणारजिल्ह्यात जवळपास १ हजार ७४३ खासगी शाळा

पुणे : संचारबंदीमुळे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये बंद करण्यात आले आहे. संचारबंदीचा कालावधी वाढवण्यात आल्याने येत्या शैक्षणिक वर्षात पाल्याला शाळेत प्रवेश कसा द्यायचा असा प्रश्न पालकांना पडला होता. जिल्हा परिषदेने यावर तोडगा काढला असून cनलाईन पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी तालुकानिहाय गुगल लिंक तयार करण्यात आली असून यामुळे घरी बसूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेता येणार आहे.
कोरोनाचे रूग्ण आढळल्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली असून सर्व शाळा महाविद्यालये बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता संचारबंदी ३ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे २०२० -२१ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश कसा द्यायचा असा प्रश्न पालकांना पडला होता. यासोबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापुढेही हा प्रश्न होता. दर वर्षी शाळा बंद होण्याआधी दखलपात्र विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण शिक्षकांना प्रत्यक्ष घरी जाऊन करावे लागत होते. मात्र, संचारबंदीमुळे ते शक्य नाही. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने  या वर्षी पूर्ण जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी तालुका निहाय गुगल लिंक तयार करण्यात आली आहे. ही प्रत्येक तालुक्यात पाठविण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करून पालकांना आपल्या परिसरातील शाळा निवडता येणार आहे. जसा पालकांचा प्रतिसाद मिळेल तसा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या बाबतची माहिती जिल्ह्यातील ३ हजार ६५१ शाळांना आणि शिक्षकांना देण्याच्या सुचना शिक्षणाधिकारी सुनिल कुऱ्हाडे यांनी केली आहे.
 

खासगी शाळांनाही नलाईल प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सुचना
जिल्ह्यात जवळपास १ हजार ७४३ खासगी शाळा आहेत. या शाळांनाही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. शाळांनी त्यांच्या स्वतंत्र लिंक तयार करून ही प्रक्रिया सुरू करावी. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि पालकांना शाळेत न बोलवता प्रवेश द्यावा अशा सुचना शिक्षणाधिकारी सुनिल कुऱ्हाडे यांनी केल्या आहेत.
.....................
शाळांची कामेही ऑनलाईन
लॉकडाऊनच्या काळात अनेक शाळा बंद करण्यात आल्या. या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून व्हॉट्सपच्या माध्यमातून तर काही शाळांनी थेट ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचा घरी बसूनच अभ्यासक्रम  घेतला.

Web Title: Home-based students can be admitted to school; Online arrangement by the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.