शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी खासगी शाळांना सुटी

By admin | Updated: February 18, 2017 03:22 IST

अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांमुळे उमेदवारांची प्रचार मोहीम जोरदार सुरू आहे, तर तेवढ्याच गतीने निवडणूक

पिंपरी : अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांमुळे उमेदवारांची प्रचार मोहीम जोरदार सुरू आहे, तर तेवढ्याच गतीने निवडणूक आयोगाचीही तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड परिसरातील खासगी शाळांना नियमित सुट्यांखेरीज दोन दिवस अधिक सुटी (सोमवार व मंगळवार) देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सगळीकडे निवडणुकीच्या प्रचार व पूर्वतयारीचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांवर आलेल्या निवडणुकांसाठी उमेदवार अहोरात्र प्रयत्न करताना दिसत आहेत. एकीकडे उमेदवारांकडून प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाची तयारीही युद्धपातळीवर सुरू आहे. आयोगातर्फे मतदानासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील काही खासगी शाळाही नियोजित करण्यात आल्या आहेत. यातील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांना आठवड्यातील शनिवार व रविवार असे दोन दिवस सुटी असते. या दोन सुट्या, निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठीचा एक दिवस व प्रत्यक्षातील मतदानाचा दिवस आदी गोष्टींचा विचार करून चार दिवस सुट्या देल्या आहेत. आयोगातर्फे निवडण्यात आलेले शिक्षक कामात व्यस्त आहेत. शिक्षकांअभावी अतिरिक्त ताण पडणाऱ्या शिक्षकांना सलग सुट्यांमुळे मात्र दिलासा मिळणार आहे. तर विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण दिसत आहे.(प्रतिनिधी)