वाढदिवसाचा केक मित्राच्या तोंडाला लावण्यासाठी त्याच्यामागे पळणाऱ्यावर वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 13:25 IST2022-07-01T13:20:16+5:302022-07-01T13:25:01+5:30
या प्रकरणी दोन मजुरांना अटक..

वाढदिवसाचा केक मित्राच्या तोंडाला लावण्यासाठी त्याच्यामागे पळणाऱ्यावर वार
पुणे : वाढदिवसाचा केक मित्राच्या तोंडाला लावण्यासाठी त्याच्यामागे पळणाऱ्या एकाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केल्याप्रकरणी दोन मजुरांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने या दोघांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. बावधन येथे वाढदिवस साजरा करताना शांत राहण्यास सांगितल्याच्या वादातून झालेल्या खून प्रकरणात हिंजवडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
चंदनकुमार जयकिशोर झा (वय २२) आणि हेमंत राजू थापा (वय २०, दोघे रा. गंगा लिजंड सोसायटी, लेबर कॅम्प, बावधन) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. या हल्ल्यात नितेश दीपक शेलार (वय १९, रा. बावधन) जखमी झाले असून, त्यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना २५ जून रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.