शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

पेशवे उद्यानात साकारणार शिवाजी महाराजांचा इतिहास

By admin | Updated: May 20, 2015 01:16 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील विविध प्रसंगांचा इतिहास सांऊड सिस्टिम तसेच शिल्पाच्या स्वरूपात पेशवे उद्यानात साकारण्यात येणार आहे.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील विविध प्रसंगांचा इतिहास सांऊड सिस्टिम तसेच शिल्पाच्या स्वरूपात पेशवे उद्यानात साकारण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, पक्षनेत्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. पेशवे उद्यानातील फुलराणीच्या ट्रॅकच्या बाजूला हे शिल्पे आणि प्रसंग उभारण्यात येणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पेशवे उद्यान पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या उद्यानास वर्षभरात एक ते दीड लाख नागरिक भेट देतात. त्यात फुलराणी, साहसी खेळाचे उद्यान पर्यंटकांची विशेष आकर्षणे ठरत आहेत. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन आता याच उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील विविध प्रसंग साकारण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेच्या चालू अंदाजपत्रकात शिवसृष्टी करण्यासाठी जी उपलब्ध तरतूद आहे त्यातून साडेचार कोटी रुपये या कामासाठी खर्च करण्यात येणार आहते. यासंबंधीचा ठराव शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी पक्षनेत्यांच्या बैठकीत मांडला होता. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेनंतर मुख्यसभेच्या मान्यतेसाठी येणार असल्याचेही हरणावळ यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)४याबाबत माहिती देताना हरणावळ म्हणाले, शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे २५ प्रसंग म्युरलच्या माध्यमातून या उद्यानात साकारण्यात येणार आहेत. या सर्व प्रसंगांचे वर्णनही सांऊड सिस्टिमच्या माध्यमातून ऐकता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रसंगाच्या ठिकाणी हेडफोन लावण्यात येणार आहेत. त्यामुळे या उद्यानात साहसी खेळांसाठी येणाऱ्या मुलांना छत्रपतींचे जीवनचरित्र अधिक सोप्या माध्यमातून समजून घेता येईल, असे हरणावळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.