VIDEO : भरधाव फॉर्च्युनर कार हॉटेलात घुसली ; एक ठार आणि दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 19:47 IST2018-04-30T15:53:24+5:302018-04-30T19:47:20+5:30
फॉर्च्युनर कारवरील वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली.

VIDEO : भरधाव फॉर्च्युनर कार हॉटेलात घुसली ; एक ठार आणि दोघे जखमी
पिंपरी : भरधाव वेगाने धावणारी फॉर्च्युनर कार हॉटेलमध्ये घुसल्याने मोठा अपघात घडला आहे. यात एक हॉटेल कामगार जागीच ठार झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सांगवी येथील फेमस चौकात घडली. ओमप्रकाश अंबादास पंदीलवार (वय ६०) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर अनंत अविनाश पंदीलवार (वय १०), सुवर्णा ओमप्रकाश पंदीलवार (वय ५०) हे जखमी झाले आहेत. चालक सचिन जाधवसुद्धा जखमी झाला आहे. शिवाय कामगार बसवराज तळपदे ( वय ५० ) हासुद्धा या दुर्घटनेत जखमी झाला आहे.
जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. वाहनचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. फॉर्च्युनर कार थेट हॉटेलमध्ये घुसल्याने ही दुर्घटना घडली.
viral video : पुण्यात भरधाव फॉर्च्युनर कार हॉटेलात घुसली#Accident#Pune#Newspic.twitter.com/CpdGnRau0Z
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) April 30, 2018