शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

पुणे पोलिसांच्या कारभारावर उच्च न्यायालयाचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 3:04 AM

अधिकाऱ्यांच्या चुका पोलीस आयुक्त लपवताहेत का?; उच्च न्यायालयाचा सवाल

पुणे : पोलीस अधिकाऱ्याने मागितलेल्या खंडणीच्या प्रकरणात तपास करून प्रतिज्ञापत्र वेळेवर दाखल न केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने पुणेपोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. तसेच पोलीस अधिकाºयांच्या चुका तत्कालीन आयुक्त लपवताहेत का, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.जामिनाच्या सुनावणीच्या वेळी पोलीस अनेक प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल न करता हाफशीट दाखल करतात. या हाफशीटला पोस्टमोर्टम रिपोर्ट, ओळख परेड रिपोर्ट, साक्षीदारांचा जबाब जोडलेले नसतात, याबद्दल देखील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.या प्रकरणी न्यायालयाने तत्कालीन सहआयुक्तांना कागदपत्रे दाखल करण्यासंदर्भात दोनदा संधी दिली होती. मात्र, कागदपत्रे दाखल केली गेलेली नाहीत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० आॅगस्ट रोजी होणार आहे. याची कल्पना पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांना द्यावी, असे आदेश न्यायमूर्ती साधना जाधव यांनी दिला आहे.हा अर्ज सहआयुक्तांनी परिमंडळ चारच्या उपायुक्तांकडे चौकशीसाठी पाठविला. दरम्यान मंगेश सातपुते याने दुसºया खंडणीच्या प्रकरणात अ‍ॅड. इब्राहिम शेख आणि अ‍ॅड. सत्यवृत जोशी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.त्यावेळी ही अर्जाची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. त्यामुळे न्यायमूर्ती साधना जाधव यांनी ६ जुलै रोजी सहआयुक्तांना बिल्डरने केलेल्या अर्जाचा तपास करून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला मात्र, त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. त्यामुळे न्यायालयाने दुसºयांदा संधी दिली होती. मात्र, पुणे पोलिसांतर्फे कागदपत्रे दाखल करण्यात आली नाहीत. त्यामुळे पोलीस आयुक्त पोलिसांना वाचवत आहेत का, त्या अर्जाची चौकशी करण्यात आली नाही का, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. पुढील सुनावणी २० आॅगस्ट रोजी होणार आहे.साक्ष फिरविण्यासाठी धमकीनोव्हेंबर २०१३ मध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुणाल पोळ या गुन्हेगाराचा खून झाला होता. त्यात बिल्डर असिफ मौलाना शेख (रा. कोंढवा) साक्षीदार होते. त्याामुळे २०१६ मध्ये पोलीस कर्मचारी अमजत पठाण यांनी शेख यांना जबाबासाठी गुन्हे शाखा ५ येथे बोलविले होते. तेथे आल्यावर पठाण याने शेख यांना पोलीस अधिकारी राजेंद्र जरक यांची भेट घेण्यास सांगितले.जरक याने शिवीगाळ करून मंगेश सातपुते याला बोलावून घेतले. सातपुते स्टेशनमध्ये आल्यानंतर त्याने शेख यांची कॉलर पकडून मी कुणाल पोळचा मर्डर केला आहे. आताच जामिनावर सुटलो आहे. साक्ष फिरवली नाही तर तुलाही गोळ्या घालून ठार मारेन, अशी धमकी दिली.यावेळी जरक याने मंगेश माझा मित्र आहे. तू त्याच्या म्हणण्याप्रमाणे साक्ष दिली नाहीस, तर तुला मोक्का लावून जेलमध्ये पाठवून देईल, अशी धमकी दिली. तसेच माझा भाऊ जेलमध्ये आहे. त्याच्या जामिनासाठी १० लाख रुपये दे, अशी मागणी सातपुते यांनी केली, असा अर्ज ३ जुलै २०१६ रोजी शेख यांनी सह आयुक्त सुनील रामानंद यांच्याकडे दिला होता.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टPuneपुणेPoliceपोलिस