अतिआत्मविश्वास, अपुरी तयारी नडली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 02:26 AM2018-08-28T02:26:39+5:302018-08-28T02:27:59+5:30

आशियाडमधील कबड्डीतील पराभवावर प्रतिक्रिया : गुणवान खेळाडूंना सर्वच स्तरावर डावलण्याचा परिणाम

High confidence, insufficient preparation ... | अतिआत्मविश्वास, अपुरी तयारी नडली...

अतिआत्मविश्वास, अपुरी तयारी नडली...

Next

पुणे : इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीतील भारताच्या वर्चस्वाला इराणच्या संघाने सुरूंग लावला. पुरूष आणि महिला या दोन्ही गटांत भारताला विजेतेपदाचा दावेदार समजले जात होते. मात्र, अतिआत्मविश्वास आणि अपुरी तयारी भारतीय संघाला नडली. यामुळे दोन्ही गटामध्ये हा संघ इराणविरूद्ध पराभूत झाला, अशी प्रतिक्रिया कबड्डी क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

आशियाई स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारत कबड्डीतील सुवर्णपदकापासून वंचित राहिला. या संघाला पुरूष गटात कांस्यपदकावर तर महिला गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरूष गटामध्ये उपांत्य फेरीत इराणने भारताचे आव्हान
२७-१८ने संपविले. महिला गटात सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय महिला इराणकडून २७-२४ असा निसटत्या फरकाने पराभूत झाला.

अनेक चुका झाल्या
खेळाडूंची निवड, अतिआत्मविश्वास आणि योग्य डावपेचातील अपयश पराभवास कारणीभूत ठरले. इराणच्या गुणवान संघाविरूद्ध मागील वेळी अवघ्या एका गुणाने आपण जिंकलो होतो. यातून आपण काहीच बोध घेतला नाही. केवळ प्रो कबड्डी लीगमधील स्टार्सना खेळवणेही भोवले.
- शांताराम जाधव,
अर्जुन पुरस्कारविजेते


तांत्रिक फरक निर्णायक
तांत्रिक गोष्टींतील वर्चस्व हा भारत आणि इराण या संघांतील फरक निर्णायक ठरला. काही वर्षांपासून या देशाने सातत्याने प्रगती केली आहे. तरीही या संघाविरूद्ध आपला खेळ इतका खालावेल, अशी अपेक्षा नव्हती. फिटनेसबाबतीतही आपले दोन्ही संघ मागे होते.
- शकुंतला खटावकर,
अर्जुन पुरस्कारविजेत्या

Web Title: High confidence, insufficient preparation ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.