शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
3
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
4
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
5
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
6
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
7
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
8
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
9
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
10
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
11
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
12
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
13
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
14
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
15
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
16
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
17
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
18
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
19
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
20
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट

...म्हणून हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन भारतात मुबलक उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 5:57 AM

डॉ. सदानंद बोरसे : औषधाचे नव्हे तर निर्मितीचे पेटंट दिले जात असल्याने इतर देशांच्या तुलनेत किंमत कमी

नेहा सराफ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारतीय कायद्यानुसार औषधाचे कोणतेही पेटंट नसून त्याच्या निर्मिती प्रक्रियेचे पेटंट दिले जाते. त्यामुळे या कायदेशीर तरतुदीनुसार भारतीय कंपन्या जगातल्या अनेक आजारांवरील औषधे कमी किमतीत उपलब्ध करून देऊ शकतात. याच कारणामुळे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, अशी माहिती औषध निर्मिती प्रक्रियेचे अभ्यासक डॉ. सदानंद बोरसे यांनी शुक्रवारी (दि. १०) दिली.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभर निर्णायक उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यावर लस तयार करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ गुंतले आहेत. मात्र हे सुरु असताना अमेरिकेने भारतासारख्या विकसनशील देशाकडे केलेल्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाच्या मागणीमुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे. बलाढ्य अमेरिका स्वत:च हे औषध का बनवत नाही, या मुद्दयावर सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. याच विषयावर डॉ. बोरसे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.या औषधाबद्दल बोलायचे झाल्यास काही विशिष्ट प्रकारचे संधिवात आणि मलेरियासाठी क्लोरोक्वीन हे मुख्यत: वापरले जाते. हे औषध कोरोना विषाणूच्या संसर्गावर प्रभावकारी असल्याचे अजून तरी निश्चित स्वरूपात पुढे आलेले नाही. कोरोना रुग्णाशी संपर्क असलेले डॉक्टर, नर्स, घरातील व्यक्ती, पोलीस, सफाई कर्मचारी प्रतिबंधक उपाय म्हणून या औषधाचा वापर करू शकतात, अशी सूचना आहे. मात्र वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्याचे सेवन चुकीचे आहे. असे केल्यास त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात, असा इशाराही डॉ. बोरसे यांनी दिला.अमेरिकेतील औषध कंपन्या व्यापारी तत्वाला डोळ्यासमोर ठेवून काम करतात. भारतातील औषध निर्मिती कंपन्यांप्रमाणे मानवता, गरजूंना मदत या गोष्टी त्यांच्यासाठी दुय्यम आहेत. औषध निर्मितीपेक्षा त्यांना भारतासारख्या देशातून औषध आयात करणे कमी खर्चाचे असेल. म्हणून त्यांनी असे केले असावे. त्यांच्या कंपन्यांवर भार न टाकता भारतासारख्या देशाला क्वचित प्रसंगी धमकावून सुद्धा गरजेप्रमाणे पुरवठा मागवू शकतात.- डॉ. सदानंद बोरसे,औषध निर्मिती प्रक्रियेचे अभ्यासक

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस