शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन जमीन मोजणीसाठी जिल्ह्यात मदत कक्ष; भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:27 IST

- ई मोजणी व्हर्जन दोनमधील अडचणी होणार दूर 

पुणे : भूमी अभिलेख विभागाच्या जमीन मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ''ई मोजणी व्हर्जन दोनमध्ये अर्ज करताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने स्वतःहून पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील हवेली, मावळ, मुळशी व पिंपरी-चिंचवड या कार्यालयांत नागरिकांसाठी मदत कक्ष स्थापन केला आहे. मोजणी अर्ज भरण्यापासून ते प्रकरण निकाली होईपर्यंत आवश्यक सर्व मदत या कक्षाद्वारे नागरिकांना मोफत मिळणार आहे.

जमीन मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे राज्यात दर महिन्याला अडीच ते पावणेतीन लाख अर्ज दाखल होतात. ही प्रकरणे वेळीच मार्गी लागावी, यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. मात्र यात कागदपत्रे स्कॅन करून ते अपलोड करावी लागतात. अनेकदा ही कागदपत्रे अपलोड करताना अडचणी येतात. कागदपत्रे जोडल्यानंतरही अर्ज बाद होण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यातून अर्ज निकाली काढणे, सर्व प्रक्रिया पुन्हा करून अर्ज भरण्यास सांगणे, अशा तक्रारी केल्या जात होत्या. त्यामुळे जमीन मोजणीसाठी विलंब होऊन पैसेही वाया जात होते.

याबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत भूमी अभिलेख विभागाने निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रभाकर मुसळे म्हणाले, “जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये मोजणी प्रकरणे ''ई-मोजणी व्हर्जन दोन'' यामध्ये स्वीकारली जातात. त्यामुळे नागरिकांना लॉगइन आयडी व पासवर्ड तयार करून मोजणी अर्ज करावा लागतो. यासोबत जमिनीचा चालू सातबारा उतारा अथवा मालमत्ता पत्रकाचा उतारा, ज्या जमिनीची मोजणी करायची आहे याच्याशी संबंधित अभिलेख अथवा नकाशे, बिनशेती मोजणी करायची असल्यास मंजूर रेखांकन आराखडा, पोटहिस्सा मोजणी करावयाची असल्यास स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नियोजन प्राधिकरण यांचेकडील तात्पुरते मंजूर रेखांकन आणि ना हरकत दाखला, ओळखीचा पुरावा (आधारकार्ड) इत्यादी कागदपत्रे ''पीडीएफ'' स्वरूपात अपलोड करावी लागतात. अर्जासोबत मोजणी शुल्क भरण्याबाबतचे चलन ऑनलाइन तयार होते. त्याचा बँकेत भरणा करून चलन ''पीडीएफ'' स्वरूपात अपलोड करावे लागते.

नागरिकांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्याबाबतची माहिती नसल्याने त्यांना मोजणी अर्ज भरताना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हवेली, मावळ, मुळशी, नगरभूमापन अधिकारी क्र. १ व २ आणि पिंपरी-चिंचवड या कार्यालयात नागरिकांसाठी ''मदत कक्ष'' स्थापन केला आहे. लवकरच जिल्ह्यातील इतर तालुक्यांतदेखील ही सुविधा निर्माण केली जाणार आहे.  - प्रभाकर मुसळे, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख 

English
हिंदी सारांश
Web Title : Help Desk for Online Land Survey Launched in Pune District

Web Summary : Pune's Land Records Department establishes help desks in Haveli, Maval, Mulshi, and Pimpri-Chinchwad to assist citizens with online land survey applications. This free service guides applicants from start to finish, addressing issues with document uploads and ensuring smoother processing.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAgriculture Sectorशेती क्षेत्रAgriculture Schemeकृषी योजना