शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

हेल्मेट सक्ती नाही एक शिस्त : के. वेंकटेशम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 20:06 IST

वाहतुकीचे व रस्त्याचे सर्व नियम पाळले तर अपघात होणार नाहीत. यासाठी संरक्षण म्हणून हेल्मेट घालणे हे कायद्यात दिले आहे.

ठळक मुद्देवाहतूक नियंमाबाबत जनजागृती करणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन

पुणे : भारत देश तंत्रज्ञान व आरोग्य या क्षेत्रात अग्रेसर आहे. भारतात नागरिक आजारने कमी अपघाताने जास्त संख्येने मृत्युमुखी पडत आहेत. आपण वाहन चालवताना हेल्मेट घालणे, विरुद्ध दिशेने वाहन न चालवणे, झेब्रा क्रॉसिंगच्या मागे थांबणे, असे वाहतुकीचे व रस्त्याचे सर्व नियम पाळले तर अपघात होणार नाहीत. यासाठी संरक्षण म्हणून हेल्मेट घालणे हे कायद्यात दिले आहे. हेल्मेटसक्ती नाही  एक शिस्त आहे, असे मत पुणे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी व्यक्त केले. 

राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे भारत कला प्रसारिणी आणि वाहतूक पोलीस शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियंमाबाबत जनजागृती करणाऱ्या चित्रप्रदर्शनात ते बोलत होते. वेंकटेशम यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन केले. वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, महानगरपालिका अतिक्रमण विभाग उपायुक्त माधव जगताप, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, भारतीय कला प्रसारिणी सभेचे पुष्कराज पाठक, अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य विलास चोरबोले उपस्थित होते. अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनातून पाच सर्वोत्तम चित्रांना पारितोषिक देऊन गौरविले. त्यामध्ये कामाक्षी कोल्हापूरे, प्रतीक्षा बऱ्हाटे , प्रतीक भुरावणे, श्रेया जोशी, ओंकार कुंजीर यांना पारितोषिके दिली. वेंकटेशम म्हणाले, १९ व्या शतकात युद्ध, रोग, दुष्काळ या तीन गोष्टींमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले होते. तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण वाढल्याने मानवाने या तिन्हीवर मात केला.विसाव्या शतकात मृत्यूचे प्रमाण कमी न होता तेवढेच राहिले. कारण या शतकात वाहने वाढत गेली. तसेच वाहतुकीचे नियम दिले असूनही ते पाळण्यास नागरिक तयार होत नसे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले. सर्व भारतीयांनी रस्ते वाहतुकीच्या कायद्यांचे पालन करायला हवे. एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यावर आपण एक माणूस म्हणूम त्याला मदत केली पाहिजे. त्याठिकाणी व्हिडिओ काढून तो प्रसारित करण्यात वेळ घालवू नये. 
सद्यस्थितीला पुणे महानगरपालिका, वाहतूक प्रादेशिक परिवहन मंडळ पुणे वाहतूक पोलीस यांच्या सहकायार्ने गेल्या महिन्यापासून अपघात नियंत्रणात मदत झाली आहे. डिसेंबरमध्ये ३५ टक्के अपघात प्रमाण कमी झाले तर जानेवारीत ४४ टक्के अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. आम्ही सर्व अपघात कमी होण्याच्या दृष्टीने प्रयन्तशील आहोत.विद्यार्थ्यांनी काढलेल्या जनजागृती चित्रांचे प्रदर्शन ११,१२,१३ या कालावधीत राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले आहे. ..............................आपल्या भारतात युद्धांमध्ये जेवढे मृत्युमुखी पडले नाहीत. त्यापेक्षा जास्त वाहतुकीच्या अपघातांमध्ये पडले आहेत. आपण सर्वांनी शून्य अपघात ही संकल्पना समाजात रुजवली पाहिजे. आपण सारे भारतीय आहोत. प्रतिज्ञेत सारे भारतीय माझे बांधव आहेत असे म्हणतो. रस्त्यावर धारातीर्थी पडलेल्या व्यक्तीला वाचवणे आपले कर्तव्य आहे. २०२१ सालापासून एकही अपघात होणार नाही असे ध्येय आम्ही ठेवले आहे. - तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसRto officeआरटीओ ऑफीसAccidentअपघातtwo wheelerटू व्हीलर