शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
3
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
4
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
5
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
6
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
7
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
8
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
9
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
10
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
11
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
12
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
13
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
14
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
15
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
16
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
17
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
19
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
20
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

पुण्यात आणखी एक अपघात! भरधाव ट्रकने सिग्नलवर थांबलेल्या तीन महाविद्यालयीन तरुणांना उडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 12:24 IST

कल्याणीनगर पोर्शे अपघातानंतर दुसरा मोठा अपघात खराडी जुना जकात नाका येथे घडला...

चंदननगर (पुणे) : कल्याणीनगर पोर्शे अपघातानंतर दुसरा मोठा अपघात खराडी जुना जकात नाका येथे घडला. नगर रस्त्यावर खराडी जकात नाका येथे भरधाव ट्रकने (एम एच 12 व्हीएफ 6441) दुचाकीवरील (एमएच 12 यु यु 6375) दोन महाविद्यालयीन तरूणांचा चिरडले. त्यात दोन महाविद्यालयीन आदिल शेख व अजुन एक (नाव नाही समजले) या तरुणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान घडला.

मृत तरूण हे वाघोली येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होते ते मुळचे उदगीर लातूर येथील आहेत. त्यातील एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जड मालवाहतूक करणारा ट्रक वाघोलीतून पुण्याकडे येत असताना खराडी जुना जकातनाका येथे अपघात घडला. याप्रकरणी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. श्यामबाबू रामफळ गौतम असे चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक शामबाबू गौतम हा वाघोलीहून (MH 12 VF 6441) घेऊन चंदननगरच्या दिशेने जात होता. जकात नाका येथे सिग्नलवर थांबलेल्या मोटरसायकला त्याने मागून जोरात धडक दिली. त्यामध्ये मोटरसायकलवरील असणारे ३ जण फरफटत गेली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघात