शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पुणे शहराला मुसळधार पावसाने शुक्रवारी झोडपले; हवामान विभागाने वर्तवला 'हा' अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2021 8:51 PM

पुण्यावर वरुणराजा मेहेरबान...

पुणे : पुण्यात ऋतुचक्र बदलले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऐन थंडीच्या मोसमात वरुणराजा पुण्यावर मेहेरबान झाला आहे. गेले काही ढगाळ वातावरण कायम राहिल्यानंतर गुरुवारी व शुक्रवारी मात्र मुसळधार पावसाने पुण्याला अक्षरश : झोडपले आहे. 

पुणे शहरातील, शिवाजीनगर, डेक्कन, वारजे माळवाडी सिंहगड रस्ता, कोथरूड,वाघोली,धनकवडी, वानवडी, येरवडा, अशा उपनगराला शुक्रवारी  दुपारपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. काल अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडालेल्या पुणेकरांनी आज घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट सोबत घेतलेले चित्र पाहायला मिळाले. 

जानेवारी महिन्यात पुण्यात नेहमीच गुलाबी थंडी पडलेली असते. पण, यंदा हवामानाने सर्वाचे अंदाज चुकविले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून आकाश ढगाळ असतानाच गुरुवारी सायंकाळी अचानक जोरदार पावसाच्या सरी सुरु झाल्या. सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत ३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या ११ वर्षात जानेवारी महिन्यात झालेला आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आहे. यापूर्वी ३ जानेवारी २०१० रोजी ०.७ मिमी आणि २५ जानेवारी २०१४ रोजी ०.१ मिमी पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली होती. 

कर्नाटक किनारपट्टीपासून महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. गुरुवारी पहाटे काही ठिकाणी पावसाचा शिडकावाही झाला. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सारसबाग परिसरात पाऊसाची भुरभुर सुरु झाली. जोरात पाऊस येणार असे वाटत असतानाच ढग पांगले. सायंकाळी साडेचार वाजता शिवाजीनगर परिसरात पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.

शुक्रवारी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान पावसाच्या जोरदार सरी आल्या. त्यामुळे प्रथमच जानेवारी महिन्यात पुण्यात रस्त्यावरुन पाण्याचे पाट वाहताना दिसून आले. शहराच्या पश्चिम भागात पावसाचा अधिक जोर दिसून आला. तसेच येरवड्यात सुमारे तासभर पावसाच्या सरी पडत होत्या. कात्रज परिसरात तुरळक पावसाच्या सरी पडल्या. 

पुणे शहरात ८ व ९ जानेवारी रोजी आकाश मुख्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० व ११ जानेवारीला आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन