शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:31 IST

घरी जाण्यासाठी रिक्षा करण्याकरिता रस्ता क्रॉस करत असताना कडेला असणाऱ्या नाल्यामध्ये त्या पडल्या आणि वाहून गेल्या

पुणे : दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गुरुवारी रात्री शहराला मुसळधार पावसाने झोडपले. दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडेल अशी शक्यताही नसताना अचानक रात्री दहानंतर शहर व परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, पुढील तीन दिवसांसाठी पुणे जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या मुसळधार पावसात ६५  वर्षांच्या ज्येष्ठ महिला वाहून गेल्या आहेत. शोभा मनोहर महिमाने असे वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे.  

शोभा या पुण्यात दर्शन पार्क फुरसुंगी येथे राहतात. त्या काल रात्री कोल्हापूर पुणे असा प्रवास करून बेंगलोर हायवेला पुलावर उतरल्या होत्या. घरी जाण्यासाठी  रिक्षा करण्याकरिता रस्ता क्रॉस करत असताना कडेला असणाऱ्या नाल्यामध्ये पडल्या. व पाण्यातून वाहून गेल्या आहेत. त्यांची महिलेची चप्पल शोधकार्य सुरु असताना पुला खाली आढळून आली आहे. अग्निशमन केंद्रा शेजारील नाल्या मध्ये पासून पुढे शोधकार्य सुरु आहे. 

तब्बल दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे पुण्यात धुवाधार आगमन झाले आहे. सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कात्रज, बिबवेवाडी, स्वारगेट, भंडारकर रस्ता, प्रभात रस्त्यासह मध्यवर्ती पेठेमध्ये मुसळधार पाऊस झाला. रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. अनेक रस्ते जलमय झाले होते. वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालविणे भाग पडत होते. काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता. आज (शुक्रवारी) मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीweatherहवामान अंदाजSenior Citizenज्येष्ठ नागरिकSocialसामाजिक