शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rain: पुण्यात मुसळधार! रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू, शहरातील अनेक भागात पाणी साचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 09:50 IST

रिपरिपीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने प्रमुख मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले

पुणे: पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. काल रात्रीपासून पावसाची हजेरी सुरूच असून पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात आकाश ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या रिपरिपीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने प्रमुख मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे सखल भागांत रस्त्यांवर पाण्याची तळी साचली आहेत. काही प्रमुख मार्गांवर खड्डे पडल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. शिवाय दिवसभर पाऊस असल्याने चारचाकी घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रोड, तसेच मध्यवर्ती भागातील अप्पा बळवंत चाैक, नारायण पेठ, सदाशिव पेठ या भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यानावरून पाणी वाहतं दिसत आहे. सकाळपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे वाहनचालकांना फटका बसला आहे. वाहनधारकांना निश्चित स्थळी जाण्यासाठी बराच वेळ लागत आहे. शिवाय अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी अडथळे येत आहेत. 

शाळा सुरू झाल्या अन् कोंडीत भर पडली

सोमवारी शहरातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांवर आता शालेय वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे काही भागात सकाळपासूनच  वाहतूककोंडी पाहायला मिळाली. यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना गर्दीतून मार्ग काढत प्रवास करावा लागला. तर काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद पडली होते. त्यामुळेही कोंडीत भर पडली.

यंदा धरणं लवकर भरणार

खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या परिरसरातही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे दरवर्षी धरणं ही जुलै महिन्यानंतर किंवा ऑगस्ट महिन्यांत भरत असली तरी यंदा पावसाचे लवकर आगमन झाले आहे. त्यामुळे धरणं लवकरच भरतील अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मिटेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान अंदाजWaterपाणीDamधरणTrafficवाहतूक कोंडी