शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

राज्याला पावसाचा मोठा फटका; ७६ जणांचा मृत्यू तर ५९ जण बेपत्ता; ९० हजार लोकांचं स्थलांतर : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 15:53 IST

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही या पावसाचा मोठा फटका आहे.

पुणे : राज्यात जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी दरड कोसळत आहेत. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला ही वस्तुस्थिती आहे. तसेच नऊ जिल्हे पूरबाधित आहे. या दरम्यान ७६ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही ५९ लोकं बेपत्ता आहेत. तसेच जखमींचा आकडा ३८ वर असल्याची माहिती आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही या पावसाचा मोठा फटका आहे. ही पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्यामागे जागतिक तापमानवाढीचा फटका असल्याचे हवामान तज्ञांचे मत आहे. 

पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, राज्यात जोरदार पाऊस सुरु असून काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान ९० हजार लोकांना स्थलांतरित केले आहे. सध्या राज्यात एनडीआरएफचे २१ पथक कार्यरत आहे. लष्कर आणि नौदलाची इतर १४ पथके देखील आहे. एनडीआरएफच्या ४८ आणि इतर अशा एकूण ५९ बोटी मदतीला असुंन त्यांच्या मार्फत मदतकार्य सुरु आहे.तसेच पूरग्रस्तांच्या कुटुंबांना तांदूळ, डाळ आणि रॉकेल देणार तसेच काही ठिकाणी शिवभोजन थाळीही सुरू करणार आहे. सगळ्या पालकमंत्र्यांना आपापल्या भागात थांबण्यास सांगितले आहे. त्या ठिकाणावरून मुख्यमंत्र्यांना व आम्हाला देत आहेत. धरणाच्या खोलीकरणाचा आणि आताच्या पूरस्थितीचा काहीही संबंध नाही. सगळीकडेच पाऊस जास्त झाला, त्यामुळे काहीच करता येत नाही अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली. 

गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने विविध ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. वाई तालुक्यात कोंडविडे, मौजेघर, महाड येथील तळीये, पोलादपूरमध्ये साखर, सुतारवाडी आणि केवनाळे आणि पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबर्ली आणि ढोकवळी यासारख्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच घाटातही दरडी कोसळल्या असून घाट बंद करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील २३ दरडप्रवण गावांचे स्थलांतर करणार

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दरडप्रवण गावांच्या यादीत पुणे जिल्ह्यातील २३ गावांचा समावेश आहे. या गावांचे दुसरीकडे स्थलांतर करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

तळीये गाव दरडप्रवण क्षेत्रात येत नाही 

दरवर्षी दरडप्रवण क्षेत्र गावांची माहिती घेतली जाते, त्या गावातील नागरिकांना धोक्याच्या अगोदर स्थलांतरित केले जाते. मात्र रायगडमधील तळीये गाव हे दरडप्रवण क्षेत्रात येत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.-----आमचे दुसरीकडे स्थलांतर करा

आमचे दुसरीकडे स्थलांतर करा, अशी मागणी या गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. दोन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि घडलेल्या घटनांमुळे हे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे नागरिक स्थलांतराची मागणी करत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारfloodपूरRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार