शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

बारामतीत अतिमुसळधार पावसाने क-हा नदीला पूर; चोवीस कुटुंबांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 09:39 IST

प्रशासनाने पहाटे पासून मदत कार्य हाती घेतले

बारामती : नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे बारामतीत क-हा नदीला पूर आला आहे. प्रशासनाने पहाटे पासून मदत कार्य हाती घेतले आहे. चव्हाण वस्तीवरील 3 कुटुंब स्थलांतरित केली आहेत.

प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने पोहचत मदतकार्य हाती घेतले आहे .जळगाव कप मधील नदीकाठावरील २० कुटुंब स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. पुणे आपत्ती व्यवस्थापन समितीकडून पथक मागविले आहे. नाझरे धरणातून ३५००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूरू आहे. त्यामुळे काही वेळाने मोरगाव बारामती रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे  धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कर्‍हा नदीत  ३५ हजार २५० क्युसेक  विसर्ग सुरू आहे.

अतिमुसळधार पावसामुळे धरणात येणार्‍या पाण्यामुळे सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कर्‍हा नदीत सुरु असलेल्या विसर्गात मोठी वाढ झाली आहे. सध्या ३५२५० क्युसेक्स इतक्या दराने कर्‍हा नदीत विसर्ग चालू आहे. तरी कर्‍हा नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत.  नदी किनार्‍यावरील सखल भागातील नागरिकांना सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीRainपाऊसWaterपाणीSocialसामाजिकriverनदीDamधरणFamilyपरिवार