शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात गणेश विसर्जनाला जोरदार पावसाची शक्यता; राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 10:36 IST

बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा पश्चिम उत्तर पश्चिम दिशेला सरकत असून त्याचा राज्यावरील प्रभाव वाढत आहे

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारपासून राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार, अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली. येत्या शुक्रवारी अनंत चतुर्दशी असल्याने या दिवशीही शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा पश्चिम उत्तर पश्चिम दिशेला सरकत असून त्याचा राज्यावरील प्रभाव वाढत आहे. त्याचप्रमाणे मान्सूनच्या कमी दाबाचा पट्टाही त्याच्या समान्य स्थितीत आहे. परिणामी, चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात बुधवारपासून पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहे.

या स्थितीमुळे राज्यातील सर्वच भागात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे काश्यपी यांनी सांगितले. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ही स्थिती शुक्रवारपासून १२ तारखेपर्यंत कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. घाट परिसरात मात्र, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला.

पुण्यात पाऊस वाढणार

- शहरात मंगळवारी दुपारी शिवाजीनगरसह पश्चिम उपनगरांत पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान विभागाने शिवाजीनगर येथे १५, पाषाण येथे ७.८ तर लोहगाव व चिंचवड येथे २ मिमी पावसाची नोंद केली. तसेच येत्या पाच दिवसांमध्ये शहरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.- अनंत चतुर्दशीच्या दिवशी अर्थात शुक्रवारी शहरात मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे विसर्जनावेळी भाविकांनी नदीपात्रात काळजी घ्यावी. याच दरम्यान धरणांच्या पाणलोटातही जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे धरणांतून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने विसर्जनावेळी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी केली आहे.

तारीख         अलर्ट          भाग

७ सप्टेंबर     यलो            उत्तर महाराष्ट्र, औरंगाबाद, जालना, पालघर ठाणे वगळता संपूर्ण राज्य८ सप्टेंबर     यलो            उत्तर महाराष्ट्र, पालघर, ठाणे वगळता संपूर्ण राज्य९ सप्टेंबर     यलो            उत्तर महाराष्ट्र, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली वगळता संपूर्ण राज्य९ सप्टेंबर    ऑरेंज           चंद्रपूर, गडचिरोली१० सप्टेंबर   यलो             कोकण मध्य महाराष्ट्र (उत्तर मध्य महाराष्ट्र वगळता)

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रGanpati Festivalगणेशोत्सवWaterपाणीSocialसामाजिक