पुणे-सातारा महामार्गावर पडला गारांचा पाऊस

By Admin | Updated: May 9, 2017 03:34 IST2017-05-09T03:34:58+5:302017-05-09T03:34:58+5:30

पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या वादळी वारा गारांसह वळवाच्या मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महामार्गावरील व आसपासची गावे मागील २४ तासांपासून अंधारात आहेत.

Heavy rain fell on the Pune-Satara highway | पुणे-सातारा महामार्गावर पडला गारांचा पाऊस

पुणे-सातारा महामार्गावर पडला गारांचा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या वादळी वारा गारांसह वळवाच्या मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महामार्गावरील व आसपासची गावे मागील २४ तासांपासून अंधारात आहेत.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर काल सायंकाळी ६ वाजता आणि आज सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत नसरापूर ते खेडशिवापूर शिंदेवाडीदरम्यान वादळी वाऱ्यासह गारांचा मुसळधार पाऊस झाला. यामुळे महामार्गावर काही काळ पाणी साचले होते. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला, तर वाऱ्यामुळे झाडे पडून विजेच्या तारा तुटल्या असून अनेक खांब वाकले आहेत. पोल्ट्री व पॉलीहाऊसचे नुकसान झाले असून महामार्गावरील व आसपासच्या गावातील वीजपुरवठा मागील २४ तासांपासून खंडित झाला आहे. यामुळे महामार्गावरील सर्व गावे अंधारात आहेत. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक नळ-पाणीपुरवठा योजना बंद असून विजेअभावी अनेक कंपन्यांना फटका बसला आहे. वळवाच्या पावसामुळे अंजिरांच्या बागांना पाणी मिळाले आहे.

Web Title: Heavy rain fell on the Pune-Satara highway