शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rain: पुण्यात पावसाचा जोर कायम; सिंहगड रस्त्याला नद्यांचे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 13:40 IST

नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. तसेच दोन ते तीन दिवस पर्यटन टाळावे - प्रशासनाच्या सूचना

पुणे : पुणे जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे काल रात्रीपासूनच पुण्यात संततधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. पूरपरिस्थिती निरमा होणाऱ्या भागात उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. पुणे शहरातील बऱ्याच भागात पाणी साचले असून सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र समोर आले आहे. शहराच्या सिंहगड रोड भागात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहने चालवणे कठीण झाले आहे. 

पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.  या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. पुण्यातील पाऊस आणि धरणातून मोठ्या प्रमाणात होणारा विसर्ग लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरपरिस्थिती भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमी आहे. परंतु पावसाचा जोर कायम राहिल्याने प्रशासनाने कामासाठीच बाहेर पडावे अशा सूचना दिल्या आहेत. पाऊस आणि घाटमाथ्यावर होणारा मुसळधार पाऊस पाहता नागरिकांनी दोन ते तीन दिवस पर्यटन टाळावे अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. 

धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होऊ लागल्याने नदीकाठच्या भागांमध्येही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. घरांमध्ये पाणी शिरू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांनाही सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुक्ख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार धोकादायक भागात भारतीय सेना, एनडीआरएफ दाखल झाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसDamधरणriverनदीenvironmentपर्यावरणSocialसामाजिक