शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
4
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
5
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
8
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
9
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
10
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
11
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
12
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
13
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
15
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
16
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
17
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
18
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
19
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
20
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?

Lonavala Rain: लोणावळ्यात पावसाचा जोर कायम; शाळांना उद्या आणि परवा सुट्टी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 17:23 IST

शहरातील अनेक भागात झाडपडी, वाहतूककोंडी तसेच गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे

लोणावळा: लोणावळ्यात मंगळवारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यावर्षीच्या सर्वाधिक म्हणजेच 24 तासात शहरात तब्बल 275 मिलिमीटर (10.83 इंच) पावसाची नोंद झाली आहे.  या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. म्हणून लोणावळ्यात खबरदारीच्या अनुषंगाने १२ वी पर्यंतच्या शाळांना उद्या आणि परवा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

नांगरगाव आदर्श सोसायटी समोरील रस्ता, शहाणी हॉलिडे होम समोरील रस्ता, नारायणी धाम समोरील रस्ता, बापदेव मंदिरासमोरील वलवण गावाकडे जाणारा रस्ता, वलवण नांगरगाव रस्ता, बाजारभागातील रस्ते अशा अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. छोटे मोठे नाले हे ओसंडून वाहत असून इंद्रायणी नदीच्या पाणीपात्रात देखील मोठी वाढ झाली आहे. कार्ला, मळवली, सदापुर या भागामध्ये इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरले आहे. देवले ते मळवली या रस्त्यावर जवळपास दीड ते दोन फूट पाणीच असल्याने नागरिकांना या पाण्यामधून वाट काढत प्रवास करावा लागत आहे.

सलग आठ दिवस शहरात पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारी सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी सुरू होत्या. रात्री देखील वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला आहे. लोणावळा शहरामध्ये यावर्षी आज अखेरपर्यंत 2601 मिमी (102.40 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आज पर्यंत 2503 मिमी (98.54 इंच) पाऊस नोंदवण्यात आला होता. आज देखील पावसाचा जोर कायम असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेlonavalaलोणावळाRainपाऊसSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षणNatureनिसर्ग