शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

Pune Rain: पुण्यात विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:53 IST

नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याचे दिसून आले

पुणे: पुण्यात  विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर  शहराला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. दिवसभर ढगाळ वातावरण असून वातावरणात गरमीही मोठ्या प्रमाणावर जाणवत होती. अखेर सायंकाळनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली.  दरम्यान, पुढील तीन दिवसांसाठी पुणे जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

यंदाचा मे महिना उन्हाळ्यापेक्षाही पावसाळी हंगामाचा अधिक ठरला. त्यातच मोसमी वाऱ्यांचे दहा ते पंधरा दिवस लवकर आगमन झाले. त्यामुळे मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. साधारपणे २७ मे नंतर पुण्यात पावसाने विश्रांती घेतली. तब्बल दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे पुण्यात धुवाधार आगमन झाले आहे. सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कात्रज, बिबवेवाडी, स्वारगेट, भंडारकर रस्ता, प्रभात रस्त्यासह मध्यवर्ती पेठेमध्ये मुसळधार पाऊस झाला. रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. अनेक रस्ते जलमय झाले होते. वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालविणे भाग पडत होते. काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता. आज (शुक्रवारी) मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने दिला आहे.

रस्ते झाले जलमय 

अचानक मुसळधार पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. सर्वच रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले. 

शहरात झाडपडीच्या ३४ घटना

पुणे सातारा रस्ता, लक्ष्मी रस्ता, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, न-हे,कोरेगाव पार्क, बाणेर, कोथरूड, वारजे, हडपसर, मार्केटयार्ड, गोखलेनगर, नवले ब्रिज, महर्षीनगर, नारायण पेठ, धनकवडी, वानवडी, वडगाव शेरी, कल्याणीनगर, धायरी, पाषाण आदीसह विविध ठिकाणी झाडपडीच्या ३४ घटना घडल्या. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान अंदाजenvironmentपर्यावरणTemperatureतापमानSocialसामाजिकTrafficवाहतूक कोंडीNatureनिसर्ग