कोरेगाव भीमा परिसरात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त; ड्रोन, सीसीटीव्हींची राहणार नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 11:08 AM2023-12-29T11:08:44+5:302023-12-29T11:10:12+5:30

बंदोबस्तासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ३ हजार २०० अंमलदार, राज्य राखीव पोलिस दलासह बाहेरील जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी

Heavy police presence in Koregaon Bhima area Drones CCTV will keep an eye | कोरेगाव भीमा परिसरात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त; ड्रोन, सीसीटीव्हींची राहणार नजर

कोरेगाव भीमा परिसरात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त; ड्रोन, सीसीटीव्हींची राहणार नजर

पुणे : कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमासाठी सोमवारी (दि. १) होणारी गर्दी विचारात घेता परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणेपोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यासाठी चार अपर पोलिसआयुक्त, ११ पोलिस उपायुक्त, ४२ सहायक आयुक्त, ८६ पोलिस निरीक्षकांसह तीन हजार दोनशे अंमलदार, राज्य राखीव पोलिस दलाच्या सहा तुकड्या, बॉम्बनाशक विरोधी पथक असा पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रभारी सहपोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख आदी उपस्थित होते. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी एक तारखेला देशभरातील अनुयायी उपस्थिती लावतात. त्यामुळे येथे लाखोंची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी तसेच तपासणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, परिसरातील गावांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. यंदा विजयस्तंभ अभिवादनसाठी गतवर्षीच्या तुलनेत अधिक गर्दी होण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी करण्यात आली असून वाहन पार्किंग, वाहतुकीतील बदल आदींचे नियोजन करण्यात आले आहे. बंदोबस्तासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीन हजार २०० अंमलदार, राज्य राखीव पोलिस दलासह बाहेरील जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी मागवण्यात आले आहेत.

असा आहे बंदोबस्त

अपर पोलिस आयुक्त - ४
पोलिस उपायुक्त - ११
सहायक आयुक्त - ४२
पोलिस निरीक्षक - ८६
सहायक उपनिरीक्षक - २७१
पोलिस अंमलदार - ३,२००
एसआरपीएफ - ६ कंपन्या
बीडीडीएस - ९ पथके
क्यूआरटी - ३ पथके

Web Title: Heavy police presence in Koregaon Bhima area Drones CCTV will keep an eye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.