राज्यात दिलासादायक चित्र! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, कोरोनामुक्तीचा दर ९४ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 16:38 IST2021-06-03T16:38:31+5:302021-06-03T16:38:38+5:30

आतापर्यंत बाधित झालेल्या ५७ लाख ६१ हजार रूग्णांपैकी ५४ लाख ३१ हजार रूग्ण झाले बरे

Heartwarming picture in the state! The patient's recovery rate increased, the coronary heart rate was 94 percent | राज्यात दिलासादायक चित्र! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, कोरोनामुक्तीचा दर ९४ टक्के

राज्यात दिलासादायक चित्र! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, कोरोनामुक्तीचा दर ९४ टक्के

ठळक मुद्देदेशात लसीकरणाच्या बातमीत राज्याचा प्रथम क्रमांक, आतापर्यंत २ कोटी २८ लाख ७२ हजार ७८८ जणांचे लसीकरण

पुणे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होरपळून निघालेल्या राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. रूग्णबरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे. आतापर्यंत बाधित झालेल्या ५७ लाख ६१ हजार रूग्णांपैकी ५४ लाख ३१ हजार रूग्ण बरे झाले आहे. देशाचा एकुण मृत्यूदर १.२८ असून राज्याचा मृत्यूदर १.६७ टक्के जास्त आहे. राज्याचा प्रवास हळूहळू कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू आहे. असे असले तरी नव्या नियमावलीचा विचार केला असता, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यातील मुंबई, पुणे जिल्हा सर्वाधिक बाधित झाला होता.मात्र, दुसऱ्या लाटेत जवळपास सर्वच जिल्हे बाधित झाले. काही मोजकी जिल्हे साेडली तर बहूतांश जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण हे वाढलेले होते. आता केवळ १० जिल्ह्यात सक्रीय रूग्णांचे प्रमाण जास्त आहे. यात पुणे, सातारा, कोल्हापुर, मुंबई, ठाणे, सांगली, अहमदनगर, नाशिक, नागपुर,सोलापुर या जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण आहेत. राज्यात लावण्यात आलेल्या नियमावलीमुळे दैनंदीन कोरोना बाधितांचा दर कमी झाला आहे. दैनंदिन होणाऱ्या चाचण्यांच्या प्रमाणात रूग्ण कमी झाले आहे. राज्यात आतापर्यंत ३ कोटी ५२ लाख ७७ हजार ६५३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. अडीच लाखांच्या आसपास रोज दैनंदीत चाचण्या होत आहे. १ जुन रोजी २ लाख २१ हजार चाचण्या करण्यात आल्या. त्या पैकी १४ हजार १२३ रूग्ण कोरोना बाधीत आढळले. मे महिन्यात रोज बाधितांचा आकडा हा कमी झाला आहे

१७ जिल्ह्याचा बाधितांचा दर राज्याच्या एकुण दरापेक्षा जास्त

राज्याच्या एकुण बाधित दर हा०.२४ टक्के आहे. मात्र, १७ जिल्ह्यांचा बाधितदर हा राज्याच्या तुलनेत जास्त आहे. यात सिंधूदुर्ग २.२०, कोल्हापुर १.७४, रत्नागिरी १.३६, सातारा १.२९,सांगली ०.९२, बुलढाणा ०.७०, बीड ०.६५ वाशिम ०.६१, उस्मानाबाद ०.५६, अमरावती ०.५५, अहमदनगर ०.५१, सोलापूर ०.५०, पालघर ०.४७, अकोला ०.४६, यवतमाळ ०.४६, रायगड ०.४३, गडचिरोली ०.३६ येवढा रग्णबाधितांचा दर आहे.

लसीकरणात देशात राज्य अव्वल

देशात लसीकरणाच्या बातमीत राज्याचा प्रथम क्रमांक आहे. राज्यात आतापर्यंत १ कोटी ८२ लाख ५३ हजार ९३५ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ४६ लाख २१ हजार ८५३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकुण २ कोटी २८ लाख ७२ हजार ७८८ जणांनी लसीकरण केले आहे. महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.

Web Title: Heartwarming picture in the state! The patient's recovery rate increased, the coronary heart rate was 94 percent