राजगडावर हृदयद्रावक घटना; ट्रेकिंगसाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीचा १५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:53 IST2025-06-06T12:52:59+5:302025-06-06T12:53:12+5:30

Rajgad Fort Trekking Accident: संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गड उतरत असताना तरुणीचा पाय घसरला आणि ती थेट १५० फूट खोल दरीत कोसळली

Heartbreaking incident at Rajgad; 20-year-old girl who came for trekking falls into 150 feet deep gorge, dies | राजगडावर हृदयद्रावक घटना; ट्रेकिंगसाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीचा १५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

राजगडावर हृदयद्रावक घटना; ट्रेकिंगसाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीचा १५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

किरण शिंदे 

पुणे: राजगड किल्ल्यावर गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली. गडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या २० वर्षीय विवाहित तरुणीचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला झालेला हा दुर्दैवी प्रकार अधिकच भावनाद्रावक ठरला आहे. मृत तरुणीचे नाव कोमल सतीश शिंदे (वय २०, रा. आळंदी, पुणे) असे आहे. ती आपल्या पतीसोबत ट्रेकिंगसाठी राजगडावर आली होती. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गड उतरत असताना कोमलचा पाय घसरला आणि ती थेट १५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर तिच्या पतीने तात्काळ आजूबाजूच्या ट्रेकर्सकडे मदत मागितली व वेल्हे पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस जवान युवराज सोमवंशी, आपत्ती व्यवस्थापनाचे तानाजी भोसले आणि गणेश सपकाळ यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर कोमलचा मृतदेह खाली आणला. रात्री उशिरा तिला वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती ती मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद वेल्हे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली असून, घटनास्थळाच्या आजूबाजील परिस्थितीचा, साक्षीदारांचा व पतीच्या जबाबाचा आधार घेत पोलीस पुढील तपास करत आहेत. 

 

Web Title: Heartbreaking incident at Rajgad; 20-year-old girl who came for trekking falls into 150 feet deep gorge, dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.