पुणे : पुणे-बंगळूर महामार्गावरील बालेवाडी परिसरात रविवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून सळ्या घसरून थेट समोरून येणाऱ्या कारमध्ये घुसल्याने काही काळ महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या अपघातातकारचालकाचा जीव थोडक्यात बचावला.
मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या टेम्पोमधील माल योग्य प्रकारे सुरक्षित न बांधल्यामुळे अचानक ब्रेक लागताच सळ्या पुढे सरकल्या आणि टेम्पोच्या बाहेर निघून समोरील चारचाकी वाहनाच्या काचा फोडत आत घुसल्या. या सळ्या थेट चालकाच्या सीटपर्यंत पोहोचल्याने अपघाताचे स्वरूप गंभीर झाले.
हा अपघात अत्यंत धोकादायक होता. कारच्या पुढील काचा पूर्णपणे फुटल्या होत्या आणि लोखंडी सळ्या आतपर्यंत घुसल्या होत्या. हे दृश्य पाहून महामार्गावरील इतर वाहनचालकांच्या काळजाचा ठोका चुकला. अपघातानंतर काही काळ वाहतूक मंदावली होती. स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला. लोखंडी सळ्या, पाईप किंवा इतर लांब वस्तूंची वाहतूक करताना त्या वाहनाच्या बाहेर येणार नाहीत याची योग्य खबरदारी घेणे आवश्यक असते. मात्र या प्रकरणात सुरक्षेचे नियम पाळले गेले नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. निष्काळजीपणे मालवाहतूक करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या टेम्पो चालकावर पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : A terrifying accident occurred on the Pune-Bangalore highway when iron rods from a truck pierced a car. The driver miraculously survived. Improperly secured cargo caused the incident. Police are investigating the negligent transport.
Web Summary : पुणे-बैंगलोर राजमार्ग पर एक भयानक दुर्घटना हुई जब एक ट्रक से लोहे की छड़ें एक कार में घुस गईं। ड्राइवर चमत्कारिक रूप से बच गया। अनुचित तरीके से सुरक्षित माल के कारण यह घटना हुई। पुलिस लापरवाही से परिवहन की जांच कर रही है।