माले येथे आरोग्य तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:15 IST2021-02-26T04:15:18+5:302021-02-26T04:15:18+5:30

तत्पूर्वी या कार्यक्रमाचे उद्घाटन हे मावळ, मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण, ...

Health check-up camp at Male | माले येथे आरोग्य तपासणी शिबिर

माले येथे आरोग्य तपासणी शिबिर

तत्पूर्वी या कार्यक्रमाचे उद्घाटन हे मावळ, मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण, सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे, बाळासाहेब चांदेरे, म्हाडाच्या संचालिका स्वाती ढमाले, महिला आघाडी पुणे जिल्हा संघटिका संगीता पवळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. तसेच विविध विकासकामांसाठी अकरा लाख रुपये व एक रुग्णवाहिका विकासनिधीतून देणार असल्याचे देखील जाहीर केले.

तर या कार्यक्रमाचा समारोप माजी आमदार शरद ढमाले, शंकर मांडेकर, सागर काटकर, विजय केदारी, संदीप जठार, अजित करंजकर, राम गायकवाड, सचिन खैरे, प्रकाश भेगडे, रविकांत धुमाळ, संतोष तोंडे, ज्योती चांदेरे, राम गायकवाड, ज्ञानेश्वर डफळ यांच्या हस्ते विविध दाखले वाटप करून करण्यात आला.

त्यावेळी नामदेव टेमघरेे, हनुमंत सुर्वे, दिलीप गुरव, अनिल अधवडे, गणपत वाशिवले, मोहन शिंदे, धनंजय टेमघरे, गोविंद सरुसे, सचिन पळसकर, अनंता वाशिवले, शिवाजी बलकवडे, नरेश भरम, पांडुरंग निवेकर, सुनील वाईकर, विश्वनाथ वीर, सुरेश शिंदे, लहू लायगुडे, शंकर जांभुळकर, किसन सोनार, एकनाथ तिडके हे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे हनुमंत सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले तर गोविंद सरोसे यांनी आभार मानले.

Web Title: Health check-up camp at Male