शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

उदे गं अंबे उदे..! शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ; यंदा ऑनलाईन दर्शनासह आरोग्याचा जागर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 12:30 AM

राज्य शासनाने गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे.

ठळक मुद्देघटस्थापना : शहरातील मंदिरांमध्ये अभिषेक, विधीवत पूजा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. शनिवारी (१७ ऑक्टोबर) चतु:शृंगी मंदिर, तांबडी जोगेश्वरी, भवानी माता, महालक्ष्मी अशा शहरातील विविध मंदिरांमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सकाळी ७ ते ९ दरम्यान पूजा, अभिषेक आणि घटस्थापना असे धार्मिक कार्यक्रम होतील. भाविकांना ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. पुढील नऊ दिवस विविध मंडळांतर्फे आरोग्याचा जागरही केला जाणार आहे.

राज्य शासनाने गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, यंदा सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. नियमावलीचे काटेकोर पालन करत देवस्थानांतर्फे अत्यंत साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. काही सार्वजनिक मंडळे ऑनलाईन लाईव्ह दर्शनाची सोय, तर काही मंडळे संकेतस्थळावर फोटो उपलब्ध करून देणार आहेत. नवरात्रोत्सवात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

चतु:शृंगी मंदिरामध्ये सकाळी नऊ वाजता देवीचा अभिषेक, षोडशोपचार पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार आहे. नरेंद्र अनगळ यंदाच्या उत्सवाचे सालकरी आहेत. दररोज सकाळी दहा आणि रात्री साडेआठ वाजता आरती करण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थानचे दिलीप अनगळ यांनी दिली. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठी स्क्रीन लावण्यात येणार आहे. तेथे भाविकांना लाईव्ह दर्शन घेता येईल. मंदिराच्या भवतालच्या परिसरात आरोग्याबाबत जनजागृती करणारे फलक लावण्यात आले आहेत.

ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्ये सकाळी सात वाजता महापूजा आणि घटस्थापना होणार आहे. देवीच्या दररोजच्या पूजेचे छायाचित्र संकेतस्थळावर भाविकांना पाहता येणार आहे. भाविकांना मंदिराबाहेरून देवीचे दर्शन घेता येईल, अशी माहिती विनायक बेंद्रे यांनी दिली. भवानी पेठेतील भवानी माता मंदिरामध्ये मुख्य विश्वस्त विनायक मेढेकर यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता महापूजा आणि घटस्थापना होणार आहे. श्री सूक्त पठण, ललिता सहस्रानाम, अष्टमीला नवचंडी याग असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत, असे विश्वस्त नरेंद्र मेढेकर यांनी सांगितले. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात शनिवारी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. क्षमा उपलेंचवार आणि नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नीलेश उपलेंचवार यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना होणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेNavratriनवरात्रीcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारHealthआरोग्य