शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भावनिक संदेश करून अचानक झाले होते गायब; अखेर दौंड तालुक्यातील 'तो' बेपत्ता पोलीस परतला घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:17 IST

पोलीस ठाण्यावर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढत अनावश्यक दडपण करून हे पोलीस कर्मचारी अचानक गायब झाले होते

केडगाव : यवत पोलीस ठाणे अंतर्गत केडगाव येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे हे गेल्या सहा दिवसांपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले होते. मानसिक तणाव, वारंवार होणारा प्रशासकीय दडपणाचा अनुभव आणि बदलीनंतरही अद्याप जुन्या प्रकरणांमध्ये गुंतवून ठेवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी भावना व्यक्त करताना केला होता. ५ डिसेंबर रोजी त्यांनी “आपल्या जीवाचे काही बरे–वाईट घडू शकते” असा खोलवर भावनिक संदेश सहकाऱ्यांना पाठवल्यानंतर ते अचानक गायब झाले.

रणदिवे यांचा मोबाईलही या कालावधीत बंद असल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणेची मोठी हालचाल झाली. त्याचदरम्यान, त्यांच्या घरी मुलीचा पहिला वाढदिवस असूनही ते उपस्थित राहू शकले नाहीत, यामुळे कुटुंबातही चिंतेचे वातावरण पसरले होते. या घटनेनंतर यवत पोलीस ठाण्यावर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आले. रणदिवे यांच्या कथित मानसिक तणावासंदर्भात पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, दौंड उपविभागीय अधिकारी बापूसाहेब दडस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, तसेच पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडे दुर्लक्ष किंवा अनावश्यक दडपण केल्याचे आरोप स्थानिक पातळीवरून करण्यात आले आहेत.

शेवटी, सहा दिवसांच्या अनिश्‍चिततेनंतर १० डिसेंबर रोजी रणदिवे आपल्या मूळ गावी परतले. ते सध्या शिक्रापूर येथे कुटुंबासोबत सुरक्षित आहेत, अशी माहिती यवत पोलिसांनी दिली. या संपूर्ण प्रकरणानंतर पोलीस विभागातील तणाव, कर्मचारी वर्गाचा वाढता मानसिक दबाव आणि प्रशासकीय संवादातील कमतरता या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. रणदिवे यांच्या प्रकरणातून पोलीस दलातील मानसिक आरोग्याच्या व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडियाcommissionerआयुक्त