Pimpri Chinchwad | रागाने का बघतो म्हणत तरुणावर कोयत्याने वार; देहूरोड परिसरातील घटना
By नारायण बडगुजर | Updated: April 15, 2023 16:35 IST2023-04-15T16:34:30+5:302023-04-15T16:35:55+5:30
गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली...

Pimpri Chinchwad | रागाने का बघतो म्हणत तरुणावर कोयत्याने वार; देहूरोड परिसरातील घटना
पिंपरी : रागाने का बघतो, असे म्हणत चार जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच कोयत्याने वार करून जबर दुखापत केली. देहूरोड येथे गुरुवारी (दि. १३) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.
उमर कासिम शेख (वय २२, रा. देहूराडे) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १४) देहूराेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. छोटू लक्ष्मण जतने, सुरज लक्ष्मण जतने, साहील लक्ष्मण जतने, लक्ष्मण जतने (सर्व रा. देहूरोड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे देहूरोड येथे एका मेडिकल दुकानावर उभे होते. त्यावेळी छोटू जतने तेथे आला. तू माझ्याकडे रागाने का बघतो, असे तो फिर्यादीला म्हणाला. मी कुठे तुझ्याकडे रागाने बघतो, असे फिर्यादी म्हणाले. त्याचा राग आल्याने छोटू जतने याने त्याचा भाऊ सुरज आणि साहील तसेच लक्ष्मण जतने यांना बोलावून घेतले. त्यानंतर छोटू याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या हाताच्या मनगटावर जोरात मारून जबर दुखापत केली. सुरज जतने याने हाॅकीस्टिकने फिर्यादीच्या पाठीत मारले. तसेच साहील व लक्ष्मण जतने यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी फिर्यादीला दमबाजी देखील केली, असे फिर्यादीत नमूद आहे.