शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चाकू व बंदुकीच्या धाकाने १० लाख रुपये लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील पुणे-अहमदनगर रस्त्याने जाणाऱ्या तिघांना दरोडेखोरांनी चाकू, तसेच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील पुणे-अहमदनगर रस्त्याने जाणाऱ्या तिघांना दरोडेखोरांनी चाकू, तसेच बंदुकीसारख्या हत्याराचा धाक दाखवीत, दमदाटी करीत मारहाण केली. एका तरुणाच्या हातावर चाकूने वार करून तिघांजवळील १० लाख रुपये आणि साहित्य लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभय पंडितराव फपाळ (वय ४०, रा. क्रांतीनगर, ता. जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सणसवाडी (ता. शिरूर) येथील अहमदनगरच्या दिशेने पुणे बाजूकडे अभय फापाळ, संजय सरोदे व अशोक मिसाळ हे काही कामानिमित्ताने दहा लाख रुपये रोख रक्कम घेऊन शुक्रवारी (दि २४) त्यांच्या जवळील कारमधून चालले होते. यावेळी क्रमांक नसलेल्या कारमधून सहा अनोळखी युवकांनी त्या तिघांना थांबवून चाकू, तसेच बंदुकीसारख्या हत्याराचा धाक दाखविला. यावेळी एका युवकाने कारमधील संजय सरोदे यांना हातावर चाकू मारून जखमी केले. तिघांना शिवीगाळ, दमदाटी करीत बळजबरीने गाडीमध्ये बसवून गाडी करंदी फाटा येथील एका अकॅडमीजवळ घेऊन जात गाडीतील दहा लाख रुपये रोख रक्कम, तसेच तिघांचे मोबाइल पाकीट, कागदपत्रे, असा १० लाख ९३ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करीत मोटारीतून फरार झाले. शिक्रापूर पोलिसांनी सहा इसमांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन आतकरे करीत आहेत.