शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
3
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
4
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
5
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
6
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
7
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
8
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
9
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
10
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
11
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
12
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
13
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
14
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
15
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
16
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
17
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
18
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
19
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
20
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या

ड्युटीवर असल्यामुळे अंत्यविधीला जाता आले नाही ; रक्तदान करून पोलिसाने वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 19:26 IST

आधारवड व मार्गदर्शक असणाऱ्या मामांचे निधन होऊनही आपल्याला जाता येत नाही ही खंत त्यांना जाणवत होती...

ठळक मुद्दे सध्या समाजाची गरज म्हणून रक्तदान केल्याची भावना

चिंचवड : राज्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले असल्याने सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द केल्या आहेत. चिंचवड येथे कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नातेवाईक वारल्याने त्यांना अंत्यविधीसाठी जाता आले नाही.म्हणून या अधिकाऱ्याने रक्तदान करून श्रद्धांजली वाहिली.त्यांच्या या कार्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांचे मामा  हे सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक होते.त्यांचे सांगली जवळील विटा येथे आकस्मिक निधन झाले.मात्र त्यांच्या अंत्यविधी साठी जाधव यांना जाणे शक्य नव्हते.आपले आधारवड व मार्गदर्शक असणाऱ्या मामांचे निधन होऊनही आपल्याला जाता येत नाही ही खंत जाधव यांना जाणवत होती.मात्र त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण सध्या समाजाची गरज म्हणून रक्तदान केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.त्यांच्या या कार्याची दखल इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेत आज रक्तदान केले.पोलिसांनी केलेल्या या कार्याचे सर्वांनी कौतुक केले.चिंचवड येथे भारतीय जैन संघटना, श्री काळभैरवनाथ उत्सव समिती ने शहरात आयोजित केलेल्या शिस्तबद्ध रक्तदान शिबिराला आज सुरवात झाली.गर्दी टाळण्यासाठी या मंडळांनी ऑन लाईन बुकिंग करण्याची व्यवस्था केली होती.या  योजनेत शहरातील ४५० रक्तदात्यांनी नाव नोंदणी केली आहे.विविध ठिकाणी सुरू केलेला हा उपक्रम ३१ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे.आज पहिल्या दिवशी विविध भागात १८० जणांनी रक्तदान करून समाजाप्रती आस्था असल्याची भावना व्यक्त केली.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात रक्तदात्यांनी दाखविलेल्या सहकार्याच्या भावाने बद्दल अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

----------------------सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचे रक्तदान : चिंचवड स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे हे ३१ मार्च रोजी सेवा निवृत्त होत आहेत.आज पर्यंत समाजात राहून सेवा करण्याची संधी मिळाली. मात्र आता निवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यात रक्तदान करून समाजाचे ऋण व्यक्त करण्याची संधी मिळाल्याचे शिंगाडे यांनी सांगितले.त्यांनी स्वतः आज रक्तदानाची सुरवात करून दिली.राज्यातील रक्तसाठा कमी असल्याने नागरिकांनी या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBlood Bankरक्तपेढी