हवेली तालुक्यात काँगे्रसकडे इच्छुकांची संख्या वाढली

By Admin | Updated: January 23, 2017 02:36 IST2017-01-23T02:36:41+5:302017-01-23T02:36:41+5:30

जिल्ह्यात सर्वाधिक १३ जिल्हा परिषदेच्या जागा असलेल्या हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेनेप्रमाणेच काँगे्रसकडेदेखील

In Haveli taluka, the number of interested candidates has increased | हवेली तालुक्यात काँगे्रसकडे इच्छुकांची संख्या वाढली

हवेली तालुक्यात काँगे्रसकडे इच्छुकांची संख्या वाढली

पुणे : जिल्ह्यात सर्वाधिक १३ जिल्हा परिषदेच्या जागा असलेल्या हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेनेप्रमाणेच काँगे्रसकडेदेखील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढील आहे. जिल्हा परिषदेच्या १३ जागांसाठी शंभरपेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असल्याची माहिती जिल्हा काँगे्रसचे वरिष्ठ चिटणीस आतुल कारले यांनी दिली.
जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र मुलाखती घेण्यात आल्या. यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी दोन निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हवेली तालुक्यातील इच्छुकांच्या मुलखाती सुरु आहेत. हवेली तालुक्यासाठी जिल्हा काँगे्रसच्या वतीने वसंतराव शेवाळे व संग्राम मोहोळ यांची नियुक्ती केली आहे. गट-गणाच्या रचनेत जिल्ह्यात हवेली तालुक्यात तब्बल तीन जागांची वाढ झाली. जिल्हा परिषदेवर हवेली तालुक्याचे वर्चस्व राहणार असल्याने सर्वच पक्षांनी या तालुक्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. काँगे्रसच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून हवेली तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती सुरु आहेत. यामध्ये पूर्व हवेली तालुक्यातील देहू- लोहगाव, वाघोली-आव्हाळवाडी, पेरणे-वाडेबोल्हाई या तीन गटांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये तीन जागांसाठी तब्बल ३५ इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे, तर पश्चिम हवेलीमधील आंबेगाव बु.- नऱ्हे, धायरी-नांदेड, शिवणे-कोंढवेधावडे आणि मांगडेवाडी-डोणजेसाठी १२, तर जिल्हा परिषदेसाठी, २० उमेदवारांनी पंचायत समितीसाठी मुलाखती दिल्या. थेऊर - लोणीकाळभोर, फुरसुंगी-कदमवाकवस्ती, मांजरी बु.-शेवाळवाडी, केशवनगर-साडेसतरानळी आणि उरुळीदेवाची-वडकीसाठी देखील इच्छुकांचे ५० अर्ज आले असल्याचे कारले यांनी सांगितले. मुलाखतीसाठी हवेली तालुका अध्यक्ष शिवदास काळभोर, प्रदेश काँगे्रसचे सदस्य श्रीरंग चव्हाण पाटील, लहू अप्णा निवंगुणे उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: In Haveli taluka, the number of interested candidates has increased