शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

Hathras Gangrape : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने पाठवल्या ‘चायना मेड ’बांगड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 11:41 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी गांधी यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की पाहता देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे..

ठळक मुद्देबारामतीत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून घटनेचा निषेध

बारामती: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. .तसेच पीडितेच्या कुटुंबियांना भेट घेण्यासाठी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की करण्यात आली.या घटनांचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. बारामती देखील त्याला अपवाद नाही. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना बांगड्या पाठवुन या घटनेचा निषेध करण्यात आला.

शुक्रवारी(दि २) महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सेक्रेटरी  मोहसिन अकबर पठाण , भरत पवार, संजय भगत, हर्षल बनसोडे आदींनी ‘चायना मेड’ बांगड्या पाठवत गांधी यांना झालेल्या घटनेचा निषेध केला.त्यासाठी बाजारपेठेतुन बांगड्या घेवुन त्या बंद लीफाफ्याद्वारे पोस्टाद्वारे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्या.उत्तर प्रदेश मध्ये माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट घडली.तसेच गांधी यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की पाहता  देशाची वाटचाल ही हुकूमशाही कडे चालली आहे. याच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना स्पेशल चायनामेड बांगड्या पाठवून निषेध केल्याचे  महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सेक्रेटरी  पठाण यांनी सांगितले.

टॅग्स :BaramatiबारामतीUttar Pradeshउत्तर प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीNCPराष्ट्रवादी काँग्रेसHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार