"महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूका घेतल्यास तीव्र आंदोलन करु" हर्षवर्धन पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 05:06 PM2021-09-15T17:06:13+5:302021-09-15T17:06:19+5:30

इंदापूर येथे भाजपाच्या वतीने आंदोलन : सरकारने त्वरित निर्णय घेण्याची मागणी

Harshvardhan Patil warns Mahavikas Aghadi government to hold agitation without OBC reservation | "महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूका घेतल्यास तीव्र आंदोलन करु" हर्षवर्धन पाटलांचा इशारा

"महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूका घेतल्यास तीव्र आंदोलन करु" हर्षवर्धन पाटलांचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देअन्यथा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून, राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार

इंदापूर : राज्यातील सात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुर्वीच झाल्या आहेत. मात्र सध्याच्या स्थितीला ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षित असणाऱ्या उमेदवाराच्या सदस्यत्वाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेतल्या तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी मंत्री व भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिला. 

भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर निदर्शने करण्यात येत आहेत. इंदापूर येथे देखील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री व भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तहसिल कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले.

''महाराष्ट्रात स्थापन झालेल्या अनैसर्गिक महाविकास आघाडी सरकारचा निषेध करीत आहोत. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने नामांकित वकील दिले नाहीत व राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी वकील उभा राहू शकला नाही खेदजनक बाब आहे. तसेच आतापर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत सर्व पक्षीय नेत्यांच्या दोन बैठका झाल्या, विरोधी पक्ष सोबत होता म्हणजे यांना निर्णय घेण्यास अडचण नसायलाच पाहिजे. मात्र जाणिवपूर्वक आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाला डावलत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.''

अन्यथा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून, राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार 

''पाच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. त्या पाच जिल्ह्यातील निवडणुका देखील आता जाहिर झाल्या असून त्याचबरोबर नगरपालिका, महानगरपालिका ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलाव्यात, अन्यथा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून, राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा माजी हर्षवर्धन पाटील यांनी दिला.'' 

यावेळी भाजपा नेते हर्षवर्धन पाटील पुणे जिल्हा सरचिटणीस अँड. धर्मेंद्र खांडरे, तानाजी थोरात, मारुती वणवे, भटक्या विमुक्त आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे, माऊली चवरे, तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार, शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद, पांडुरंग शिंदे, गटनेते कैलास कदम, गोरख शिंदे, तेजस देवकते, प्रेमकुमार जगताप, सुयोग सावंत आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसिलदार श्रीकांत पाटील यांना देण्यात आले. यावेळी पाटील बोलत होते. 

Web Title: Harshvardhan Patil warns Mahavikas Aghadi government to hold agitation without OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.