इंदापूर पंचायत समितीवर पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांच्या गटाचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:37 PM2020-01-01T17:37:37+5:302020-01-01T17:49:47+5:30

गुलाल व हलगीच्या कडकडाटात जल्लोष

The Harshavardhan Patil group lead second time on Indapur panchyat samiti | इंदापूर पंचायत समितीवर पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांच्या गटाचे वर्चस्व

इंदापूर पंचायत समितीवर पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांच्या गटाचे वर्चस्व

Next
ठळक मुद्देसभापतिपदी पुष्पाताई रेडके, तर उपसभापतिपदी संजय देहाडे : इंदापूर पंचायत समिती ही  एकूण १४ सदस्यांचीअप्रत्यक्षपणे इंदापूर पंचायत समिती ही भाजपाच्या ताब्यात

इंदापूर : राज्यात पंचायत समितीच्या पार पडलेल्या सभापती व उपसभापती निवडीमध्ये इंदापूर पंचायत समितीमध्ये राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याच गटाचे सलग दुसऱ्या वेळेस कारभार आल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
यावेळी इंदापूर पंचायत समिती सभापतिपदी पडस्थळ येथील पुष्पाताई रेडके तर उपसभापतिपदी भिगवण गणातुन निवडून आलेले संजय देहाडे यांची निवड झाली आहे. त्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील गटाकडे पुन्हा एकदा इंदापूर पंचायत समितीची सूत्रे हाती आली आहेत. त्यामुळे यावेळी शेकडो पाटील समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करत हलगीच्या कडकडाटात सभापती  व उपसभापती यांच्या निवडीचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. इंदापूर पंचायत समिती ही  एकूण १४ सदस्यांची असून, यामध्ये मागील पंचायत समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसच्या लढतीत काँग्रेस पक्षाची बाजी मारली होती. मात्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केल्याने, सध्या अप्रत्यक्षपणे इंदापूर पंचायत समिती ही भाजपाच्या ताब्यात आली आहे. पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडणुकीमध्ये वेगळा चमत्कार घडणार अशी चर्चा होती. मात्र, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालणा-या पंचायत समितीवर पुन्हा एकदा माजीमंत्री पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.
या निवडणूकीच्या दरम्यान राष्ट्रवादी पक्षातून निवडून गेलेला एक सदस्य गैरहजर असल्याने, राष्ट्रवादीचे संख्याबळ १ ने घटले व ५ विरुद्ध ८ असा काँग्रेसचा विजय झाला. त्यामुळे सभापती म्हणून पुष्पाताई रेडके तर उपसभापती म्हणून संजय देहाडे यांचा विजय झाला. २०१७ मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पक्षाचे ८ सदस्य निवडून आले होते तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेसचे ६ सदस्य निवडून आले होते. त्या वेळी सभापती म्हणून खुल्या प्रवगार्तुन करणसिंह घोलप यांची तर उपसभापती म्हणून देवराज जाधव यांची निवड झाली होती.  नंतर च्या काळात हर्षवर्धन पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश त्या मुळे  किती सदस्य हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत जाणार या कडे सर्वांचे लक्ष होते.
यावेळी बोट वर करून झालेल्या मतदानात सभापती पदासाठी रेडके यांना ८ मते तर वणवे याना ५ मते मिळाली उपसभापती पदासाठी पाटील गटांचे संजय देहाडे यांना ८ मते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारिका लोंढे यांना ५ मते मिळाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  सदस्य प्रदिप जगदाळे या वेळी अनुपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती व उप सभापती याचा सत्कार  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी केला या वेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.४अडीच वर्षाचा कालावधी समाप्त झाल्यामुळे सभापती पदाचे आरक्षण नागरिकांचा इतर 

..............................

महिलेचे  वर्चस्व

मागास प्रवर्ग स्त्री असे आरक्षण जाहीर झाल्याने ३१ डिसेंबर रोजी इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या सभेमध्ये पाटील गटाकडून सभापती पदासाठी बिजवडी गणातील पुष्पा रेडके तर उपसभापती पदासाठी भिगवण गणातील संजय देहाडे यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस कडून सभापती पदासाठी शितल वणवे तर उपसभापती पदासाठी सारिका लोंढे यांनी अर्ज दाखल केला होता.

Web Title: The Harshavardhan Patil group lead second time on Indapur panchyat samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.