Video : हरिचंद्रगडावर महाशिवरात्रीला दुर्घटना; खिरेश्वर मार्गावर दगड कोसळून भाविक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 15:45 IST2026-02-15T15:45:09+5:302026-02-15T15:45:23+5:30

- वैद्यकीय उपचारासाठी नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Harishchandragad accident news Accident on Mahashivratri at Harichandragad; Devotees killed after stone falls on Khireshwar road | Video : हरिचंद्रगडावर महाशिवरात्रीला दुर्घटना; खिरेश्वर मार्गावर दगड कोसळून भाविक ठार

Video : हरिचंद्रगडावर महाशिवरात्रीला दुर्घटना; खिरेश्वर मार्गावर दगड कोसळून भाविक ठार

ओतूर (जुन्नर): महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी भेट दिलेल्या हरिचंद्रगड येथे रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाला. गडावरून खाली उतरताना कड्यावरून निसटलेल्या दगडाचा जबर आघात झाल्याने ही घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

मृत भाविकाचे नाव सुरेश किसन दामसे (वय ३५, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे आहे. ते दर्शन आटोपून जुन्नर दरवाज्याकडील पायवाटेने खाली उतरत होते. यावेळी कड्यावरचा सैल दगड अचानक निसटून त्यांच्या डोक्यावर आणि पाठीवर कोसळला. गंभीर दुखापत झाल्याने ते घटनास्थळीच बेशुद्ध पडले.



स्थानिक ग्रामस्थ व इतर भाविकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. दुर्गम आणि कठीण पायवाट असल्यामुळे जखमी अवस्थेत त्यांना सुमारे पाच किलोमीटर पायी चालत खिरेश्वर गावात आणण्यात आले. तेथून पुढे वैद्यकीय उपचारासाठी नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गडावर मोठी गर्दी असल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कड्यावरून सैल दगड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे दामसे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Web Title : हरिश्चंद्रगढ़ त्रासदी: महाशिवरात्रि तीर्थयात्रा में पत्थर गिरने से भक्त की मौत

Web Summary : महाशिवरात्रि पर हरिश्चंद्रगढ़ में उतरते समय एक चट्टान गिरने से एक भक्त की मौत हो गई। पुणे के घोड़ेगांव के सुरेश दामसे, 35, गंभीर रूप से घायल हो गए। इस घटना ने भारी भीड़ के बीच सुरक्षा चिंताओं को बढ़ा दिया है, जिससे अधिकारियों द्वारा तत्काल निवारक उपायों की मांग की जा रही है।

Web Title : Harishchandragad Tragedy: Rockfall Kills Devotee During Mahashivratri Pilgrimage

Web Summary : A devotee died at Harishchandragad after being struck by a falling rock while descending on Mahashivratri. Suresh Damse, 35, from Ghodegaon, Pune, was fatally injured. The incident raises safety concerns amid large crowds, prompting calls for immediate preventative measures by authorities.