Hanuman Jayanti 2026 : चापेकर बंधूंनी शपथ घेतलेली मारुती मूर्ती आजही पोलिसांच्या ताब्यात; सर्वसामान्यांना दर्शन नाही

By किरण शिंदे | Updated: April 2, 2026 10:10 IST2026-04-02T10:09:39+5:302026-04-02T10:10:47+5:30

पुण्यात हजारो हनुमान भक्त असतानाही या ऐतिहासिक मूर्तीच्या दर्शनासाठीही कोणी पुढे आल्याचे दिसत नाही. कारण ही मूर्ती पोलीस ठाण्यात असल्याने सर्वसामान्यांना सहज प्रवेश मिळत नाही.

Hanuman Jayanti 2026 The Maruti idol that the Chapekar brothers took oath on is still in police custody; common people cannot see it | Hanuman Jayanti 2026 : चापेकर बंधूंनी शपथ घेतलेली मारुती मूर्ती आजही पोलिसांच्या ताब्यात; सर्वसामान्यांना दर्शन नाही

Hanuman Jayanti 2026 : चापेकर बंधूंनी शपथ घेतलेली मारुती मूर्ती आजही पोलिसांच्या ताब्यात; सर्वसामान्यांना दर्शन नाही

पुणे - पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात हनुमानाची एक अशी मूर्ती आहे, ज्याचा संबंध थेट भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी जोडला जातो.. याच हनुमानाच्या मूर्ती समोर वीर चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रॅण्डच्या हत्येची शपथ घेतली होती. रँडच्या हप्ते नंतर जेव्हा चाफेकर बंधूंना अटक करण्यात आली तेव्हा ही मूर्ती ब्रिटिशांनी जप्त केली होती.. आणि तेव्हापासून आजपर्यंत ही मूर्ती पोलिसांच्या ताब्यात आहे. 

तेव्हा मुद्देमाल म्हणून जप्त करण्यात आलेली ही मूर्ती आजही फरासखाना पोलीस ठाण्याच्या इमारतीत सुरक्षित ठेवण्यात आली आहे. रॅण्डच्या हत्येनंतर इंग्रजांनी तपासादरम्यान ही मूर्ती जप्त केली होती. विशेष म्हणजे, अजूनही या मूर्तीची ‘मुद्देमाल’ (जप्त वस्तू) म्हणून नोंद आहे. तेव्हापासून ही मूर्ती पोलिसांच्या नोंदीतच राहिली आहे. आजतागायत या मूर्तीला बाहेर काढून सार्वजनिक दर्शनासाठी ठेवण्याबाबत कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. पुण्यात हजारो हनुमान भक्त असतानाही या ऐतिहासिक मूर्तीच्या दर्शनासाठीही कोणी पुढे आल्याचे दिसत नाही. कारण ही मूर्ती पोलीस ठाण्यात असल्याने सर्वसामान्यांना सहज प्रवेश मिळत नाही.

इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या मते, पेशव्यांच्या काळात फरासखाण्याची जागा कपडे ठेवण्याचा गोदाम होता. पुढे इंग्रजांनी याठिकाणी पोलीस स्टेशन स्थापन केले. रॅण्डच्या हत्येनंतर चापेकर बंधूंना याच लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. ऐतिहासिक नोंदींनुसार, ही मारुती मूर्ती देखील त्याच काळात पोलिसांच्या ताब्यात आली.

या मूर्तीचे ऐतिहासिक महत्त्वही मोठे आहे. असे सांगितले जाते की, रँडची हत्या करण्यापूर्वी चाफेकर बंधूंनी याच मूर्तीसमोर गोळीबाराचा सराव केला. इतकच नाही तर या मूर्ती समोरच त्यांनी शपथही घेतली होती. त्यामुळेच ब्रिटिश सरकारने ही मूर्ती महत्त्वाचा पुरावा म्हणून जप्त केली होती.

स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्ष ही मूर्ती पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातच होती. नंतर एका हनुमान भक्त पोलीस कर्मचाऱ्याने या मूर्तीची पूजा सुरू केली. हळूहळू पोलीस ठाण्यातच एक छोटेखानी मंदिर उभारण्यात आले. आणि त्यानंतर आजही प्रत्येक शनिवारी पोलीस कर्मचारी या मूर्तीची पूजा करतात.

Web Title : चापेकर बंधुओं की शपथ वाली हनुमान मूर्ति अभी भी पुलिस हिरासत में

Web Summary : पुणे में एक हनुमान मूर्ति, जिसके सामने चापेकर बंधुओं ने ब्रिटिश अधिकारी रैंड की हत्या करने की शपथ ली थी, अभी भी पुलिस हिरासत में है। उनकी गिरफ्तारी के बाद अंग्रेजों द्वारा जब्त की गई, यह तब से फरासखाना पुलिस स्टेशन में रखी गई है। जनता के लिए पहुंच प्रतिबंधित है क्योंकि इसे सबूत माना जाता है।

Web Title : Hanuman Idol, Sworn Upon by Chapekar Brothers, Still Held by Police

Web Summary : A Hanuman idol, before which the Chapekar brothers vowed to assassinate British officer Rand, remains in police custody in Pune. Seized by the British after their arrest, it's been kept at Faraskhana Police Station ever since. Public access is restricted as it's considered evidence.