शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नराधम आफताबला लवकरात लवकर फाशी द्या; राज्य महिला आयोगाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 15:37 IST

राज्य महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाकडे पत्रव्यवहार केला असल्याचे रुपाली चाकणकर सांगितले

पुणे : दिल्लीतील महरौली येथील फ्लॅटमध्ये 28 वर्षीय आफताब पूनावाला याने 18 मे रोजी त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची निर्घृणपणे हत्या केली. या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत.  आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे केले. या घृणास्पद कृत्यामुळे समाजातील सर्वच स्तरावरून आफताबवर टीका होऊ लागली आहे. राज्य महिला आयोगाकडूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात यावी. तसेच आफताब नराधमाला लवकरत लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. तसेच यासाठी राज्य महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाकडे पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  चाकणकर म्हणाल्या, वसई, महाराष्ट्राची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत झालेली निघृण हत्या आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची झालेली विटंबना हे सर्वच माणुसकीला काळीमा फासणारे आहे. मिसिंग तक्रारीनंतर याप्रकरणी मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी तत्पर कारवाई केल्याने या ५ महिन्यापुर्वी झालेल्या गुन्ह्याचा छडा लागला. मात्र आता आव्हान आहे. आरोपीच्या विरोधात ठोस पुरावे आणि सशक्त दोषाआरोपपत्र लवकर दाखल करण्याचे. तसेच या नराधमाला ही लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हायला हवी. या प्रकरणाचा तपास जलद होउन फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालावी यासाठी राज्य महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाकडे पत्रव्यवहार केला आहे. यापुढे ही राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीSocialसामाजिकDeathमृत्यू