शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

पुणे मेट्रोसाठी बालेवाडीतील साडेपाच हेक्टर जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 6:41 AM

हिंजवडी-शिवाजीनगर २३.२ किलोमीटरच्या मेट्रोसाठी बालेवाडी येथे ५ हेक्टर ६० आर जागा देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या जागेचा वाणिज्यिक विकासातून मेट्रोसाठी निधीची उभारणी करण्यात येणार आहे.

पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर २३.२ किलोमीटरच्या मेट्रोसाठी बालेवाडी येथे ५ हेक्टर ६० आर जागा देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या जागेचा वाणिज्यिक विकासातून मेट्रोसाठी निधीची उभारणी करण्यात येणार आहे. साधारण बाजारमूल्यानुसार १५३ कोटी रुपये या जागेची किंमत आहे. या मेट्रो प्रकल्पातील शासकीय हिस्सा म्हणून राज्य शासन पीएमआरडीएला ही जागा देत आहे, अशी माहिती पुणे महानगर विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सार्वजनिक-खासगी सहभागाने संकल्पन करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. याची बहुतेक कामं पूर्ण व्हायच्या मार्गावर आहेत. ५० एकरांचा भूखंड शेतकऱ्यांशी चर्चा करून डेपो म्हणून घेण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. राज्य शासनातर्फे मिळालेला भूखंड पीएमआरडीए विकसित करणार आहे.पुण्यात आधिच मेट्रोचे दोन ट्रॅक आहेत, त्यांच्या कामांना वेग आला आहे. हिंजवडी हा औद्योगिक परिसर आहे आणि इथे सुमारे दीड दोन लाख लोक खासगी वाहनाने येत असतात. इथे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो असावी, अशी मागणी होती. आज मंत्रीमंडाळाच्या जागेच्या मंजुरीमुळे मेट्रोच्या कामाला गती मिळाली आहे. पुण्यातील वाहतूक नियोजनासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे.पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी येथील ५ हेक्टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळून शहरातील वाहतुकीची समस्या दूर होणार आहे.- गिरीश बापट, पालकमंत्री

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे