संतापजनक! तेरा वर्षीय मुलीवर दोन महिन्यांपासून करत होता लैंगिक अत्याचार; नराधमाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 12:59 PM2022-01-16T12:59:21+5:302022-01-16T12:59:59+5:30

प्रकार उघडकीस आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली

Had been sexually abusing a thirteen year old girl for two month a man arrested | संतापजनक! तेरा वर्षीय मुलीवर दोन महिन्यांपासून करत होता लैंगिक अत्याचार; नराधमाला अटक

संतापजनक! तेरा वर्षीय मुलीवर दोन महिन्यांपासून करत होता लैंगिक अत्याचार; नराधमाला अटक

Next

पिंपरी : घरात एकटी असलेल्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना १२ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ या कालावधीत तसेच डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत घडली. 

शिवा किसन राठोड (वय २१, रा. सुसगाव, ता. मुळशी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शनिवारी (दि. १५) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची अल्पवयीन मुलगी घरामध्ये एकटी असताना आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध केले. गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली.

Web Title: Had been sexually abusing a thirteen year old girl for two month a man arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app