शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

नाे पार्किंगमधून दुचाकी उचलणारी मुलं करतात मुजाेरी ; नागरिकांचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 5:50 PM

नाे पार्किंगमध्ये लावण्यात अालेली दुचाकी उचलताना अनेकदा कंत्राटावर गाड्या उचलण्यासाठी नेमण्यात अालेल्या मुलांकडून मुजाेरी करण्यात येत असल्याचा अनुभव नागरिकांना येत अाहे.

पुणे : नाे पार्किंगमध्ये लावण्यात अालेली दुचाकी उचलताना अनेकदा कंत्राटावर गाड्या उचलण्यासाठी नेमण्यात अालेल्या मुलांकडून मुजाेरी करण्यात येत असल्याचा अनुभव नागरिकांना येत अाहे. वाहतूक पाेलिसांनी स्वतः टेम्पाे मधून उतरुन कुठल्या वाहनावर कारवाई करायची हे सांगणे अपेक्षित असताना अनेकदा कंत्राटी मुलंच गाडी उचलत असून ती गाडी काेठून उचलली याचा फाेटाे काढण्यात येत नसल्याचे दिसून येत अाहे. तसेच त्यांना वाहनचालकांकडे लायसन्स मागण्याची परवानगी नसताना मुजाेरपणे नागरिकांकडून लायसन्स हिसकावण्यात येत असल्याचा अनुभव अनेकांना अाला अाहे. त्यामुळे या मुलांची मुजाेरी थांबणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात अाहे. 

    पुण्यात दुचाकींची संख्या दिवसेंदिवस वाढत अाहे. दरराेज पुणेकरांना वाहतूक काेंडीचा सामना करावा लागत अाहे. त्यातच दुचाकी लावण्यासाठी वाहनचालकांना पार्किंग मिळवणे कठीण झाले अाहे. वाहतूक पाेलिसांकडून नाे पार्किंगमध्ये लावण्यात येणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्यात येते. त्यासाठी कंत्राटी मुले नेमण्यात अाली असून ही मुले वाहतूक पाेलिसांच्या अादेशानुसार नाे पार्किंगमधील वाहने उचलून टेम्पाेत भरत असतात. परंतु शहारातील बहुतांश भागात वाहतूक पाेलिस हे टेम्पाेतून खाली उतरतच नाहीत. ही मुलेच नाे पार्किंगमधील वाहने उचलत असतात. ज्या ठिकाणावरुन गाडी उचलली अाहे ते ठिकाण नाे पार्किंग हाेते, हे दाखविण्यासाठी कारवाई करण्यापूर्वी गाडीचा नाे पार्किंगमध्ये असल्याचा फाेटाे काढणे अपेक्षित असताना ताे फाेटाेही गाड्या लवकर उचण्याच्या नादात काढण्यात येत नाही. तसेच वाहनचालकांना लायसन्सची मागणी करण्याचा कुठलाही अधिकार या मुलांना नसताना मुजाेरपणे ही मुले वाहनचालकांकडून लायसन्स हिसकावत असतात. 

    साईनाथ गुणवड म्हणाला, मी एके ठिकाणी दुचाकी लावून चहा पित हाेताे. मी गाडीवर बसलेलाे असताना मला गाडी उचलणाऱ्या मुलाकडून लायसन्सची मागणी करण्यात अाली. माझे लायसन्स हातातून हिस्कावून ताे मुलगा निघून गेला. नाे पार्किंगमधून गाड्या उचलताना वाहतूक पाेलिसांच्या देखरेखेखाली कारवाई हाेणे अपेक्षित असताना पाेलीस हे टेम्पाेतून खाली उतरत सुद्धा नाहीत. गाडी नेमकी नाे पार्किंगमधून उचलली का नाही हे सुद्धा पाेलिसांना माहित नसते. त्याचबराेबर गाडी उचलणारी मुले ही नागरिकांशी अरेरावीची भाषा करतात. तुला काय करायचे ते कर अशा पद्धतीने नागरिकांशी बाेलत असतात. 

    एक मुलगा नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाला, जंगली महाराज रस्त्यावर अाज कारवाई करताना वाहतूक पाेलीस टेम्पाेत उपस्थित नव्हते. जे नागरिक जागेवर पावती करण्यास तयार असतात त्यांची पावती तेथेच न करता त्यांची गाडी उचलून नेली जाते. वस्तूतः तेथेच त्यांची पावती करुन त्यांची गाडी ताब्यात देणे अावश्यक अाहे. 

    दरम्यान याबाबत वाहतूक शाखेच्या उपायुक्त तेजस्वी सातपुते यांना फाेनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क हाेऊ शकला नाही. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसMONEYपैसा